नाशिक मिरर वेबटीम : नाशिक महानगरपालिका सातपुर विभागाच्या वतीने उघड्यावर कचरा जाळणे ,सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे,घंटा गाडी मध्ये कचरा टाकताना वर्गीकरण न करणे,प्लास्टिक पिशवी वापरणे,सर्व्हिस चार्जेस प्रमाणे मोकळ्या भूखंडावरिल बांधकाम मलबा उचलणे,मोकळ्या भूखंडावर मलबा ( डेब्रीज) टाकणे,पाळीव श्वानाने रस्त्यावर घाण करणे, आणि मास्क न वापरणे अशा एकुण ६३४ केसेस नोंद करून सातपूर विभागात एकुण ४ लाख ५५ हजार ३६० इतक्या १ एप्रिल २०२० ते २१ जानेवारी २०२१ या १० महिन्याच्या कालावधी मध्ये दंड आकारुन कारवाई करण्यात आली आहे. यावेळी ही कारवाई संचालक कल्पना कुटे,सातपुर विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे,केतन मारु,एकनाथ ताठे, विक्रम दोंदे,चिंतामण पवार,प्रल्हाद जयकर तसेच सर्व स्वछता मुकादम यांच्यावतीने करण्यात आली.
