नाशिक मिरर वेबटीम : भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पेट्रोलियम पदार्थांचे नैसर्गिक स्त्रोत हे अतिशय मर्यादित आहेत. त्यामुळे एक ना एक दिवस ते या भू-तळावरुनच संपुष्टात येणार आहे. मात्र आजच्या आधुनिक व धकाधकीच्या जगात सध्या तरी प्रत्येकाला आपली दैनदिन दिनचर्या पेट्रोलियम पदार्थांच्या वापराशिवाय पार पाडणे शक्य नाही. मात्र असे असले तरी वर्षातून किमान एक महिना तरी आपण या नैसर्गिक उर्जेच्या स्त्रोताची थोडी तरी बचत करु शकतो, याच उद्देशाने
 ‘सक्षम -२०२१’( संरक्षण क्षमता महोत्सव)हा एक महत्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून नैसर्गिक इंधन वाचवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे नवल किशोर व  वहराप्रसाद पल्ला मुख्य प्रबंधक सेल यांनी सातपूर औद्योगिक वसाहती मधील क्षेत्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार  परिषदेत सांगितले. नाशिक जिल्ह्यात एचपीसीएल, पेट्रोलियम तर्फे  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.पुढे बोलताना नवलकिशोर  म्हणाले की देशात आपण दररोज पेट्रोलचे विविध उत्पादन वापरतो.दररोज पेट्रोलियम पदार्थांची विक्री होते.आणि ग्राहक ती वापरत असतात. मात्र भारत सरकारची योजना आहे की, वर्षातून अकरा महिने तर आपण पेट्रोलियम उर्जेचा वापर तर करीत असतोच, मात्र दरवर्षी १५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान किमान हा एक महिना तरी भारतीय नागरिकांनी कमीत कमी प्रमाणात या उर्जेचा वापर करावा,यामुळे या नैसर्गिक उर्जेची बचत होईल व पर्यावरणाला देखील फायदा पोहोचेल.यासाठीच सक्षम २०२१ या उपक्रमाची सुरवात भारत सरकारने केली असून नुकतेच महाराष्ट्राच्या तेल उद्योगातर्फे आयोजित १६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यिारी यांच्या हस्ते या उपक्रमाचे ऑनलाईन उदघाटन पार पडले.हा कार्यक्रम यू-ट्यूबवर थेट प्रक्ष्ेपित करण्यात आला आहे.हा एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम असून आपल्या देशाच्या उर्जा सुरक्षा,शाश्‍वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने हा उपक्रम सुरु केला असल्याची माहीती त्यांनी दिली.जीवाश्‍म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे,परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे ,आणि जीवाश्‍म इंधनांच्या ज्वलनशीलतेमुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना(पीसीआरए)पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समनव्यक यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्या संबधित राज्य सरकारच्या सक्रीय सहभागाने आणि पाठिंब्याने विविध उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमात प्रामुख्याने शाळा,महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंधन संवर्धन,पेट्रोल पंप,गॅस एजन्सीज इ.बाबत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.याशिवाय बैठक,कार्यशाळा इ.द्वारे इंधन संवर्धनावरीलमोहिमा,गृहीणींसाठी  गट चर्चा, विविध सामाजिक संस्थांसाठी मोहिम,ईंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा,रेडीयो व दूरचित्रवाणीवरील चर्चा इ.उपक्रम आयोजित केले असल्याचे ते म्हणाले.महाराष्ट्र राज्यात सक्षम-२०२१ या उपक्रमात सुमारे २४ विविध उपक्रमांचे अायोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी २००० पेक्षा अधिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बातम्या

Don`t copy text!