नाशिक मिरर वेबटीम : गंगापूर पोलीसानी दि.२१ जानेवारी रोजी संशयित आरोपी चा पाठलाग करून त्यांच्याकडून गावठी बनावटीची पिस्टल हस्तगत केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की , गंगापूर पोलीस ठाणे मधील पोलीस शिपाई गणेश हिंडे व होमगार्ड पंकज गवळी हे दि. २१ जानेवारी रोजी डि.के नगर मध्ये बीट मार्शल ड्युटी असताना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कटारिया ब्रिज जवळील सुयोजित गार्डन च्या बाजूने गोदावरी नदीकाठी असलेल्या म्हसोबा मंदिर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, दोन इसम संशयितरित्या गार्डनमध्ये फिरताना दिसून आले.त्यांचा पोलीस शिपाई गणेश हिंडे यांना संशय आल्याने त्यांनी थांबन्यास सांगितले. परंतु सदर ठिकाणाहून ते पळून जात होते, म्हणून त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले व त्यांना विचारपूस केली असता, त्यांच्याकडे पिस्टल आग्निशस्त्र मिळून आले. पोलीस शिपाई हिंडे यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करून पोलिस मदत मागून घेतली. त्यानंतर डीबी पथकाने पोलीस अंमलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे घटनास्थळी उपस्थित झाले. दोन पंचासमक्ष ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी संशयित इसमाचे नाव सुहास जेम्स काळसेकर (वय ४३ रा शरणपूर गाव संत अंद्रिया सर्च) व अरुण वसंत गांगोटे लंगोटे ( वय ३० रा. पंडित कॉलनी) असे आहे.एकूण १० हजार ३०० रुपये किंमतीचे गावठी बनावटीची पिस्टल, पिस्टलचे मॅगझिन, एक जिवंत राउंड अग्नी शस्त्राचा पंचनामा करून आरोपींवर भारतीय हत्यार अधिनियम कलम ३/२५ व भारतीय दंड विधान कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त दिपक पांडे , पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक परदेशी, पोलीस शिपाई गणेश हिंडे, होमगार्ड पंकज गवळी, राहुल सोळसे, तुषार देसले, प्रदीप खर्डे, यांनी मोहीम पूर्ण केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.
