जॉय ऑफ गिविंग
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक मधील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आधाराश्रय मित्र फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षी प्रमाणे या दिवाळी ला पण गरीब व अनाथ मुलांची दिवाळी गोड करण्यासाठी मदतनिधी व वस्तू स्वरूपात पुण्यदान मागवत आहे. या वर्षी कोरोना मुळे सर्व अनाथ मुलांना मदतीची जास्त गरज आहे .दरवर्षी प्रमाणे अनाथ मुलांना अनाथ आश्रमात अन्नदाते व दान येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आपल्या ला फक्त आपल्या घासतला एक घास अनाथ मुलांसाठी द्यायचा आहे . आपल्या मुळे कोणच्या तरी आयुष्यात आनंद येणार आहे ही कल्पना च किती मनाला सुखद आंनद देऊन जाते . या दिवाळी ला आपण त्या मुलांना व वृद्धांना नवीन कपडे , जुने कपडे , स्वेटर , दिवाळीचे फराळ , सॅनिटीझर , मास्क , मेडिसिन , धान्य इत्यादी देऊ शकता ,प्रत्येकाला ज्या स्वरूपात मदत करत येईल त्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहन आधाराश्रय मित्र फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोज सांगळे यांनी सर्व नागरिकांना केले आहे.फाउंडेशन चे सहकारीमित्र प्रा मनोज सांगळे , जगदीश निकम , जान्हवी राजोळे , अर्जुन पावसे , भावेश भामरे , कल्याणी सोळंके , अनुज झाम्बरे , भुषण राऊत , हेमंत भामरे , वर्षा पाटील , पल्लवी वडजे , विशाल पिंगळे , प्रा मनीषा कुलकर्णी , आरती अहिरे , योगिता बागुल , किरण पाटील , गंजेंद्र जाधव , अविनाश सोनवणे , दिपमाला राजोळे , दत्ता राजोळे , पुनम निकम , श्रद्धा राजपुत , कविता सोळंके , रोशन सोळंके , शुभम पाटील , रोशनी खैरनार , गोकुळ दरगोडे , भरत भाऊ , निवृत्ती सांगळे याकामी मदत करीत आहेत.
हा उपक्रम आपण १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर मध्ये राबविण्यात येणार आहे.आपली इच्छा असेल तर आपण रोख मदत देखील करू शकतात. ( जमलेल्या पैसे मधून नवीन कपडे घेतले जाणार आहे )
Google pay and phone pay number – 8149503609
.मोबाईल नंबर :
8149503609 , 7385067226 , 7796055376 , 7972070260 , 8421350055 , 8552939444.
