नाशिक मिरर वेबटीम : नांदगाव तालुक्यात फ्रि फायर गेंम खेळण्याच्या वेसनातुन मित्रानेच मित्रा खून केल्याची घटना नांदगाव शहरात घडली आहे. संशयीत आरोपी सुनिल शिवाजी मोरे रा भौरी ता नांदगांव याने त्याचा मिञ असलेला जिभाऊ मधुकर गायकवाड वय ३६ याचा निघृण खुन केला असल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याची माहीती पोलीस सुञांनी दिली .जिभाऊ मधुकर गायकवाड व संशयीत आरोपी हे मिञ होते. दोघेही भौरी गावात राहत होते . जिभाऊ गायकवाड याचा मोबाईल फोन संशयीत आरोपीने फ्रि फायर गेंंम खेळण्यास मागीतला त्यास नकार मिळाल्याने त्याने संतापाच्या भरात जिभाऊ यांचा दगडाने ठेचुन खुन केला. दि २५ नोव्हेंबर रोजी राञी हि घटना घडली मयताचे वडील मधुकर गायकवाड यांनी फिर्याद नोंदविल्यावर तपास अंती खुनाचा गुन्हा उघड झाला. या कामी नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव .चंद्रकांत खांडवी यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी केलेले मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी .समीरसिंह साळवे , मनमाड उपविभाग यांचे पथकाने सदर गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेवुन ४८ तासाचे आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक .सिध्दार्थ आहीरे , नांदगांव पोलीस ठाणे हे करीत आहेत .
