नाशिक मिरर :  सातपूर येथील राधाकृष्णनगर मधील सरोदे संकुल मध्ये बुधवार दि.२० एप्रिल रोजी गॅस सिलेंडर चा भडका होऊन आईचा मृत्यू तर मुलगी गंभीर भाजल्याची घटना घडली आहे.
                 याबाबत अधिक माहिती अशी की , बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अर्चना ललेंद्र सिंह(रा.सरोदे संकुल रु.न ५ वय ४० )  या  स्वयंपाक करत असतांनी गॅस नळी मधून  गॅस लिकेज होऊन अचानक पणे आगीचा भडका झाला.त्यामुळे आगीत अर्चना या ७५ टक्के भाजल्या गेल्या आहेत.त्यांना उपचार साठी अस्वस्थ अवस्थेत नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू करण्या आधीच सदर महिलेचा मृत्यू झाला.तर मुलगी  आस्था ललेंद्र सिंह (वय १६ ) ही देखील आगीत    २० टक्के भाजली गेली. तिला अशोकनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार साठी दाखल केले आहे.अर्चना यांचे पती ललेंद्र सिंह यांनी आगीतून दोघींना वाचवण्याचे शर्थी चे प्रयत्न केले.परंतु अर्चना या घाबरल्याने आगीतून बाहेर पडण्यास हिंमत दाखवत नव्हत्या. त्यामुळे होरपळून मृत्य झाला .यावेळी आग नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले होते. 

बातम्या

Don`t copy text!