नाशिक मिरर : वृत्तसेवा
सातपूर शिवजन्मोत्सव २०२४ समितीच्या सातपूर अध्यक्षपदी अनिल गडाख तर कार्याध्यक्षपदी फरीदा सलीम शेख यांची सर्वानुमते शनिवार दि. १४ रोजी निवड करण्यात आली आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्षपदासाठी २५ तर कार्याध्यक्षपदासाठी ६ नावे समितीकडे आली होती. मात्र बिनविरोधाची परंपरा खंडित होऊ नये,यासाठी प्रतिस्पर्धकांनी माघार घेत अनिल गडाख व फरीदा शेख यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व पक्षीय व सर्व समाज समावेशक अशी ही निवड प्रक्रिया पार पडली.
दरम्यान, मावळते अध्यक्ष सचिन गांगुर्डे व कार्यध्यक्ष वृषाली सोनवणे यांनी नवनियुक्त अध्यक्ष गडाख व शेख यांचे स्वागत केले.उर्वरित कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कोअर कमिटीने सांगितले. सातपूर विभागातील ज्या शिवप्रेमींना समिती मध्ये काम करायचे आहे, त्यांनी सदर बैठकीला उपस्थतीत रहाण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक योगेश शेवरे, समितीचे मावळते अध्यक्ष सचिन गांगुर्डे, माजी अध्यक्ष किशोर निकम, निवृत्ती इंगोले, संजय राऊत, नितीन निगळ, गंगाराम सावळे यांच्यासह दिनकर कांडेकर, रवीद्र देवरे, संजय जाधव, देवा जाधव, मुन्ना तुपे, जीवन रायते, लोकेश गवळी, गौरव जाधव, हेमंत शिरसाठ आदीसह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितत होते.
