सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये अपघात सत्र सुरूच 
नाशिक मिरर वृत्तसेवा : 
        सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये सीएट कंपनी समोर मनपाच्या सिटी लिंक बसने आपल्या दुचाकीवर कामावर जाणाऱ्या कामगारास जोरदार धडक दिल्याने कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
          याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी विश्वनाथ झोटे (वय: ५३ रा. शिवाजी नगर) हे आपली दुचाकी क्र.एमएच १५ एए ८९७० ने शनिवार  १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कामावर जात होते. तेव्हाच नाशिक मनपाची सिटीलिंक बस क्र. एमएच १५ जीएन ७६९८ भरधाव वेगाने जात असताना शिवाजी यांच्या दुचाकीला कट लागला यात शिवाजी यांच्या डोक्याला जबरी मार लागून जागीच मृत्यू झाला.
         शिवाजी झोटे हे सातपूर मध्ये लिज्जत पापड कंपनी मध्ये कामास होते.त्याच्या पश्चात  दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. सातपूर पोलीस स्टेशन मध्ये शिवाजी यांच्या नातेवाईक कंपनी मधील कामगार मोठी गर्दी केली होती. सिटी लिंक च्या वाहचालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. मनपाच्या माध्यमातून आर्थिक मदत म्हणून भरपाई द्यावी.अशी मागणी केली आहे.
           सातपूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी नातेवाईक यांना नियमानुसार कारवाई करून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करू असे सांगितले,तेव्हा नातेवाईक समाधान व्यक्त केले. कार्बन नाका ते ज्योती स्टेक्चर कंपनी पर्यंत चा मुख्य रस्ता असून देखील अरुंद आहे. तसेच पावसाळी नाल्यावर अरुंद पूल आहेत. या रस्तावर मोठ्या प्रमाणात नेहमी अपघात होत असतात.सातपूर पोलिसांनी अधिक चौकशी साठी बसचालक व वाहक यांना ताब्यात घेतले असून अधिक चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते बंजरंग शिंदे व माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांनी अनेकदा
मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त ट्रॅफिक विभाग यांना सदर अपघात प्रवण रस्ता वर उपाययोजना करून, रस्ता रुंदीकरण व रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग करणाऱ्यावर कारवाई करावी याबाबत निवेदन दिले आहेत.परंतु कारवाई होत नसल्याने व रस्ता रुंदीकरण होत नसल्याने कामगाराना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे दिसून येत आहे.याबाबत स्थानिक मा. नगरसेवकाची देखील भूमिका उदासीन दिसून येत आहे. औद्यगिक वसाहतीमधील प्रश्नाविषयी कारवाई होत नसल्याने
वंचित बहुजन आघाडी नाशिक शहर सचिव बजरंग शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला प्रशासनास दिला आहे.

बातम्या

Don`t copy text!