नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मध्ये प्रभाग क्रमांक ९ मध्ये श्रमिकनगर मधील कार्बननाका जवळ नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मा.सभागृहनेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्या मुळे तब्बल ४ एकर जागेवर मनपाची भव्य अशा शाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित लोकार्पण होऊन परिसरातील विद्यार्थासाठी सुरु होणार आहे.एकीकडे नाशिक शहरात नाशिक मनपाच्या एकूण १२८ शाळा पैकी ९० शाळा सुरु असून, विद्यार्थाच्या पटसंख्या अभावी ३५ ते ४० शाळा बंद करून तेथील विद्यार्थी अन्य शाळा मध्ये सामावले जात आहेत. तर सातपूर मध्ये नाशिक मनपाच्या शाळा मध्ये विद्यार्थी पटसंख्या ,विद्यार्थी व पालकाची मनपा शाळा दिली जात असलेली पसंदी, तसेच कामगार वसाहत असल्याने गरीब,होतकरू पालकाकडून मनपाच्या शाळाना सातपूर मध्ये पसंती दिली जात आहे. त्यामुळे शिवाजीनगर-श्रमिकनगर भागात नवीन शाळेसाठी दिनकर पाटील यांनी सन – १९९३ पासून पिंपळगाव शिवार श्रमिकनगर मध्ये शाळेच्या राखीव भूखंडावर शाळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. नाशिक शहरातील एकूण मनपाच्या सर्व शाळामध्ये २४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील तब्बल २ हजार ४०० विद्यार्थी शिवाजीनगर-श्रमिकनगर मधील शाळामध्ये शिक्षण घेत आहेत. नवीन शाळेचे वैशिष्ट म्हणजे मनपाच्या ४ एकर जागेवर १ एकर भागात शाळेची इमारत तर उर्वरित जागा विद्यार्थांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होणार आहे. ४ एकर जमीन साठी ८ कोटी रुपये तर बांधकामासाठी एकूण ८ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच शाळेच्या पहिल्या मजल्याच्या कामास देखील मंजुरी मिळाली असून पहिल्या मजल्या साठी ४ कोटी रुपायांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे बांधकाम देखील लवकरच सुरु होणार आहे. शाळेला आकर्षक रंग-रगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकाच्या पाहताच क्षणी नजरेत भरत आहे. शाळेच्या चारही बाजूने वृक्षरोपण करण्यात आले आहे. मुख्य रस्त्याला व कॉलनी रस्त्याला अशी दोन प्रमुख प्रवेश द्वार देण्यात आले आहे. शाळेला ‘श्री. शिव छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, असे नामकरण करण्यात आले असून याबाबत ठराव देखील मंजूर झाला आहे. शिवाजीनगर मधील मनपा शाळा क्र. २१ व २२ मधील १ ली ते ७ वी चे विद्यार्थी तसेच ८ वी ते १० चे विद्यार्थी –विद्यार्थीनी अशी एकूण १ हजार ५०० विद्यार्थी सदर नवीन शाळेत शिक्षण घेणार आहे. तर शिवाजीनगर मधील मनपा जुन्या शाळेत १ ली ७ पर्यंत केवळ मुलीची शाळा चालवली जाणार आहे.

सदर मनपा शाळा उभारण्यासाठी नाशिक मनपाप्रशासनाकडे १९९३ पासून पाठपुरवा करत होतो.अखेर त्याला यश मिळाले असून मनपा शाळेची भव्य अशी वास्तू तयार झाली आहे. शाळा त्र्यंबक-गंगापूर लिंकरोड वसून ३६ मीटर रस्त्यावर असल्यामुळे सातपूर विभागातील हजारो विद्यार्थांना विनाअडथला शिक्षण घेता येणार आहे. सदर शाळा डीझीटल व विद्यार्थांना शाळेत शिक्षण घेण्यास, अभ्यासात गोडी निर्माण होईल अशी असणार आहे.- दिनकर पाटील, मा.सभागृह नेते तथा नगरसेवक नाशिक मनपा

बातम्या

Don`t copy text!