नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर
संपूर्ण विश्वाला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षण,धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्राची गोडी निर्माण करणारे भगवान गडाचे महंत राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा अशोक नगर येथील नागरे चौकात संपन्न झाला. संत भगवान बाबा सेवाभावी मंडळाच्या वतीने या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, मा. महापौर अशोक मुर्तडक, मा. नगरसेवक शशिकांत जाधव, कामगार नेते डॉ. डी एल कराड, मा. नगरसेविका इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर, सामाजिक कार्यकर्ते भगवान काकड, बाळासाहेब जाधव, गोकुळ नागरे, इंद्रभान सांगळे, तानाजी जायभावे, अरुण घुगे, राजेश दराडे, शिवाजी शहाणे, लहाणू धात्रक, सार्थक नागरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सोमवार दि. १३ जानेवारी सायंकाळी आठ ते दहा दरम्यान भागवताचार्य भीमरावजी महाराज दराडे शास्त्री आळंदी यांचे कीर्तन झाले. तर मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा वाजे दरम्यान ह भ प श्री तुकाराम महाराज मुंडे शास्त्री श्रीरत्नेश्वर संस्थान टोकवाडी परळी यांचे जाहीर कीर्तन झाले. यावेळी मुंडे महाराज शास्त्री यांनी भगवान बाबा यांच्या कार्याची माहिती आपल्या कीर्तनातून दिली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संत भगवान बाबा सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष बाबुशेठ नागरगोजे, संभाजी पालवे, विष्णू बेळगे, नीलकंठ पालवे, योगेश घुगे, निलेश शिरसाट, राजू मिसाळ, जितेंद्र बडे, शहादेव खाडे, कोंडीबा नागरे, बाबासाहेब मिसाळ, अंबादास कारखेले, विठ्ठल खेडकर, पोपट शिरसाट, सुरेश बारगजे, बालाजी घुगे, गणेश जायभावे यांच्यासह भगवान बाबा सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
