माजी नगरसेवक सलीम शेख यांनी केली निकृष्ट दर्जाच्या कामाची केली पोलखोल
नाशिक मिरर : वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीत नुकतेच करण्यात आलेले रस्ते डांबरीकरन चक्क हाताने उकरले जात असल्याचे समोर आले आहे. माजी नगरसेवक सलीम शेख यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली आहे. यामुळे पुन्हा एकदा मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभार माजी नगरसेवक सलीम शेख यांनी उघडकीस आणला आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील टीडीके इपकॉस येथील हॉटेल सुग्रास जवळ अतिशय निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम सुरु असल्याने त्यावर शेख यांनी आक्षेप घेतला आहे. सलीम शेख यांनी स्वतःच्या हाताने रस्त्यावर टाकलेला डांबर काढत प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सलीम शेख यांनी नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार उघडकिस आणल्यानंतर अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून आहे.
प्रशासकाने कारवाई करावी
रस्ता डांबरीकरण सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी मनपाचा कुठलाही अधिकारी किंवा कॉलिटी कंट्रोलचे अधिकारी उपस्थित नाही. त्यामुळे ठेकेदाराचं फावत असून नागरिकांच्या पैशाची उधळण होत आहे. या कामाची पाहणी करत संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी.
– सलीम शेख, मा. नगरसेवक नाशिक महानगरपालिका
