सद्यस्थितीत २ हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २ हजार १४० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सद्यस्थितीत २ हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये आज ५५ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत एकूण १ हजार ९०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे,तर आज एकूण ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .रत्ना रावखंडे यांनी दिली आहे.
एकूण उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १७९, चांदवड ३२, सिन्नर १५८, दिंडोरी ६२, निफाड ७८, देवळा २५, नांदगांव ५१, येवला १४, त्र्यंबकेश्वर २७, सुरगाणा ०६, पेठ ००, कळवण ३०, बागलाण १४९, इगतपुरी ०८, मालेगांव ग्रामीण १५ असे एकूण ८३४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२७ तर जिल्ह्याबाहेरील ०४ असे एकूण २ हजार ८६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ६ हजार ९०९ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी : जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४.९७, टक्के, नाशिक शहरात ९५.९४ टक्के, मालेगाव मध्ये ९३.३२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.८७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ इतके आहे.
एकूण मृत्यु :
नाशिक ग्रामीण ७३७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९५०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७२ व जिल्हा बाहेरील ४५ अशा एकूण १ हजार ९०४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
◼️१ लाख ६ हजार ९०९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख २ हजार १४० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ८६५ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ टक्के.
दि.२० डिसेंबर रोज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- ४१७
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली एकूण वाढ
नाशिक मनपा- 149
नाशिक ग्रामीण- 158
मालेगाव मनपा- 10
जिल्हा बाह्य- 07
एकूण वाढ:- 324
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 1909
आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु : 5
नाशिक मनपा- 03
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00
