नाशिक मिरर वेबटीम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागाच्या वतीने शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातपूर विभागात विविध स्पर्धाचे आयोजन केले होते. त्याचे पारीतोषीक वितरण समारंभ व कोरोना महामारीत सातपुर विभागात सेवा केलेल्या सामाजिक संस्थाचा सन्मान समारंभ, व रक्तदान शिबिर माजी खा. समीर भुजबळ,प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले,शहराध्यक्ष रजंन ठाकरे ,गटनेते गजानन शेलार,युवक अध्यक्ष अंबादास भाऊ खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी प्रास्ताविक सातपुर विभाग अध्यक्ष जिवन रायते यांनी केले. पव मान्यवरांच्या हस्ते सातपुर विभागातील प्रमुख संस्थाचा सत्कार करून निबंध व रांगोळी स्पर्धेच्या स्पर्धकांना पारीतोषीक देण्यात आले. यावेळी सप्तश्रंगी जेष्ठ नागरीक संघ,ओम साई मित्र मंडळ,कर्तव्य सेवाभावी सामाजीक संस्था,मुक्ती महिला सेवाभावी संस्था,आशा सेविका विजया कोष्टी आदी सन्मान करण्यात आला.यावेळी महिला अध्यक्षा अनिता भामरे,निवरूती महाराज अरींगळे,रईस शेख,सातपूर विभाग अध्यक्ष जिवन रायते,नाशिक शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,मधुकर मौले, नाशिक पश्चिम विधान सभा युवक अध्यक्ष नितीन निगळ,युवक अध्यक्ष निलेश भंदुरे सरचिटणीस विकास सोनवणे,प्रविण नागरे, ऋषीराज खरोटे,अरुण भोसले, अमित कोथमिरे, सचिन मंडलिक, राहुल निफाडे, युवक नवराज रामराजे, सिद्धांत काळे,रामदास मेदगे,कल्पेश कांडेकर, संदिप पवार,निलेश जाधव, किरण शिंदे, पंकज भामरे,गणेश नवले,स्वप्नील दुसाने,अरूण पाणपाटील,नरेद्र पुणतांबेकर,धनंजय खैरनार, सचिन मटाले, शरद सांगळे,राधाकिसन पंडित, महिला पूनम शहा, आशा भांडुरे, अपेक्षा अहिरे, आदी सातपूर विभागातील पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमासाठी सातपुर विभागातील सर्व पदाधिकारी ,महिला ,नागरीक, विद्यार्थी,पालक,शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचलन विकास सोनवणे,प्रविण नागरे,किरण शिंदे, आदीनी केले.आभार धनंजय रहाणे यांनी मानले.

बातम्या

Don`t copy text!