नाशिक मिरर : ३ में रोजी होऊ घातलेल्या रमजान ईद, अक्षय तृतीय , आगामी निवडणूका व नमाज पठण करतेवेळी भोंगे बंद असावेत अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने घेतली आहे.त्यामुळे राजकीय व सामाजिक परिस्थिती बिघडून जातीय- दंगली भडकू शकतात. अशी शक्यता लक्षात घेऊन नाशिक शहर पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्या आदेशानुसार सातपूर पोलिसांनी दि.२९ एप्रिल रोजी स्वारबाबा नगर लोंढे मार्गावर भडकलेल्या दंगली वर नियंत्रण कसे मिळवावे या यांचे प्रात्यक्षिक केले.व जखमी ना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नवरदेवाची लग्नाच्या मिरवणुकीत उदळण्यात आलेला गुलाल जवळील मशिदीत पडतो व यावरून हिंदू – मुस्लिम समाजात दंगली उसळतात.यात दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक केली जाते,जाळपोळ केला जातो. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणाबाजी केली जाते.अशा घटनेचे चित्र उभे केले जाते व सातपूर पोलिस व इतर जवळील पोलीस स्टेशन चे कर्मचारी व अधिकारी सौम्य लाठीमार करून जमा झालेल्या गर्दी ला पिटाळून लावतात.अग्निशमन दलाची वाहने जाळपोळ नियंत्रनात आणतात. यावेळी सातपूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी आगामी सण- उत्सव, बदलती राजकिय घडामोडी च्या पार्श्वभूमीवर सदर मॉक ड्रिल घेण्यात आल्याचे यावेळी सांगितले.तसेच सातपूर शहर परिसरातील समाजातील सर्व जाती व धर्माच्या लोकांनी एकोप्याने राहण्याचे आवाहन यावेळी केले आहे.

