नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

जेसीआय पंचवटी होलीसिटीच्या `अनुरूप बंधन-२०२१’ या जेसीआय सप्ताहच्या अध्यक्षपदी तेजश्री धाकराव, तर सचिवपदी अमृता कर्नाटकर यांची निवड करण्यात आली. यावेळेस संस्थापक पराग झालावत, झोनचे उपाध्यक्ष राहुल पवार, अध्यक्ष पवन पवार, माज़ी अध्यक्ष आकाश ब्राह्मणकर, जयंत दराडे, प्रणव कर्नाटकर, लक्ष्मी पवार, स्नेहा ब्राह्मणकर, कविता दराडे, लेखा झालावत, अश्विन कर्पे आदी सदस्य उपस्थित होते.

`अनुरूप बंधन-२०२१’ या सप्ताहातंर्गत लसीकरण मोहीम, महिला सशक्तीकरण, नवीन सदस्य नोंदणी, महिलासाठी क्रिकेट, रक्तदान शिबिर, शहरातील समस्या निवारण आदी उपक्रम ९ ते १५ सप्टेंबरपर्यत  घेण्यात येणार आहे. सर्व नाशिककरानी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन तेजश्री धाकराव व अमृता कर्नाटकर यानी केले आहे.

बातम्या

Don`t copy text!