नाशिक मिरर वेबटीम : नाशिक महापालिकेच्या फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महानगर प्रमुखपदी जेष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी नाशिक शहरासाठी शिवसेनेने २ महानगप्रमुख म्हणून सचिन मराठे आणि महेश बडवे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु तरी देखील शिवसेनेचा प्रभाव नाशकात दिसून आला नाही. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सिडको विभागातील नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सुधाकर बडगुजर हे २००७ पासून महापालिकेत नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहत आहेत. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते असे महत्वाची पदे त्यांनी यापूर्वी सांभाळली आहेत, यामुळे आता महानगरप्रमुख पदी झालेली निवड महत्वाची मानली जात आहे. नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूका डोळ्या समोर ठेवून ही खांदेपालट केली आहे.

बातम्या

Don`t copy text!