धुक्यात हरवले नाशिक शहर

नाशिक मिरर वेबटीम :
नाशिक जिल्हा व शहरात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीने गारठलेले नाशिककर मंगळवारी (दि.१५) रोजी पहाटे पासून मात्र दाट धुक्यात हरवले होते.धुके इतके दाट होते समोरचे वाहन अथवा व्यक्ती देखील दिसत नव्हती. सातपूर- अंबड औद्योगिक वसाहती मध्ये देखील हीच स्थिती होती.पहाटे मॉर्निग वाँक साठी नागरिकांनी गर्दी दिसून आली.नागरिकांनी धुक्याचा आंनद घेतला.पहाटेची बोचरी थंडी अन् दाट धुके,अशा आल्हाददायक वातावरणाचा अनुभव भल्या सकाळी नाशिककरांनी घेतला. नाशिककर सध्या सुरुवातीची थंडी अन् निसर्गाने परिधान केलेली ही धुक्याची नवी नवलाई अनुभवत आहेत.

पहाटे फेरफटका मारण्यासाठी जाताना या दाट धुक्याचा सामना करत नाशिककरांना ‘धुक्यात हरवली वाटे मध्ये तिचा नवा थाट दिसून आला.यंदा च्या हिवाळ्यातील हे शहरात पडलेले पहिले धुके होते.त्याची अनुभूती नागरिकांनी घेतली.पंचवटीतील गोदाघाट परिसरातील मंदिरे ,सातपूर, अंबड औद्योगिक वसाहती मधील रस्ते धुक्यात हरवली होती. रस्त्याने मार्गक्रमण करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. धुक्यामुळे समोरचे वाहनाचा दिसत नसल्याने वाहनांचे दिवे सुरू करून वाट काढावी लागत होती.


गोदावरी नदीवरील अहिल्यादेवी होळकर पूल, रामवाडी पूल,सोमेश्वर, इंद्रप्रस्थ पूल, शहीद अरुण चित्ते पूल या ठिकाणी वाहने थांबवून नागरिक सेल्फी व व्हिडिओ घेत धुक्याचा आनंद लुटताना दिसत होते.

Don`t copy text!