नाशिक मिरर वेबटीम :नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष रामचंद्र निगळ यांनी सातपूर एमआयडीसीकडून नऊ एकर जागा महापालिकेने आरक्षित करून या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून याठिकाणी महिला व पुरुषांसाठी व्यायामशाळा, टेबल टेनिस व बॅटमिंटन हॉल, ५० मीटर शुटींग रेंज, जॉगिंग ट्रॅक, तरणतलाव व भव्य असे सभागृह उभारण्यात आले. सुरवातीला या क्लब हाऊस ला नाशिक शहरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. परंतु कालांतराने महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे क्लब हाऊस चे आज डब हाऊस झाले आहे. कारण आजच्या स्थितीला या ठिकाणी महिला व पुरुषान साठी बनविण्यात आलेली व्यायामशाळा, टेबल टेनिस व बॅटमिंटन हॉल, सभागृह बंद अवस्थेत आहे. तर शुटींग रेंज साठी असलेला हॉल भाडेतत्त्वावर खाजगी प्रशिक्षकानां देण्यात आला आहे, जॉगिंग ट्रॅकला सकाळी व सायंकाळी जॉगर्स व पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मुलांची गर्दी होत असते. परंतु त्यांना देखील असुविधांचा फटका बसत आहे. यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रभाग ११ मधील क्लब हाऊस येथील मैदानावरील कचरा साफ सफाई तसेच झाडांना नेहमीत पाणी टाकणे बाबत,वापरात नसलेली व्यायामशाळा सूरु करणे ,टेबल टेनिस व बॅटमिंटन हॉल पुन्हा सुरू करून खेळाडू साठी मुक्त असावे. याबाबत विभागीय अधिकारी नितीन नेर यांना सातपूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.सातपूर क्लब हाउस येथील ग्राउंड मध्ये सकाळी सातपूर प्रभागातील सर्व नागरीक,विद्यार्थी,खेळाडू हे नियमित व्यायाम तसेच पायी जॉगिंग करण्यासाठी येत असतात. मैदानावर वर ठिक-ठिकाणी कचरा , प्लास्टिक ,दारूच्या बॉटल अशा आढळुन येतात.रात्री मद्यपी चा वावर असतो.त्यामुळे सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा. तसेच काही पाणी अभावी झाड सुकलेली आहेत , त्यांना नेहमीत पाणी टाकून पुनजीवन द्यावे.याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने नाशिक पश्चिम चे अध्यक्ष नितीन निगळ,युवक अध्यक्ष निलेश भंदुरे,रामदास मेदगे,भावेश निर्वाण, तुषार दिवे,सनी बंदावणे,सनी बर्वे, कृष्णा जाधव आदीनी निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली.दिवस-रात्र रंगतात पत्त्याचे डाव व दारुड्यांचे बार

क्लब हाऊस परिसरात जवळचं राहणाऱ्या उपद्रव व टवाळखोर मुलामध्ये पत्त्याचे डाव रंगतात, व दुपार व रात्रीच्या सुमारास या ठिकाणी दारुड्यांचे बार भरलेला दिसतो. तसेच अडगळीच्या ठिकाणी प्रेमयुग्लाचे अशील चाळे सुरु असतात. यामुळे येथे अनेकदा अपसाद वाद देखील होतात.

दुर्गंदी व कचऱ्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य

क्लब हाऊस परिसराची स्वच्छता व निगा राखण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पसरलेला असतो, व क्लब हाऊसचा काही भाग हा शहरातील घंटागाडया लावण्यासाठी दिलेला असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते.

स्वच्छता गृह व पिण्याच्या पाणीची वणवा

क्लब हाऊस परिसरात जॉगिंग ट्रॅक वर जॉगिंग व पोलीस भरतीचा सराव करणारे विद्यार्थीची गर्दी मोठ्या प्रमाणत असते, तर सातपूर विभागात क्लब हाऊस येथे एकमेव तरणतलाव असल्याने येथे नागरिकांची गर्दी असते, परंतु तरी देखील याठिकाणी स्वच्छता गृह व पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्याने, या ठिकाणी आलेल्या नागरिकांनची गैरसोय होत असल्याचे दिसते आहे. या ठिकाणी स्वच्छता गृह व पिण्याची पाणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु ते बंद असल्याने त्यांचा कोणताही फायदा येथे येणाऱ्या नागरिकांना होत नाही.

या ठिकाणी होऊ शकतो एक उत्तम क्रीडा संकुल

क्लब हाऊस येथे सातपूरकरांसाठी एक उत्तम असे क्रीडा संकुल होऊ शकते. फक्त त्यासाठी प्रशासनाची इच्छा शक्तीची आवश्यकता आहे. या ठिकाणी असणारे व्यायामशाळा, टेबल टेनिस व बॅटमिंटन हॉल, सभागृह, शुटींग रेंज, हॉली बॉल, जॉगिंग ट्रॅक, नव्याने दुरस्त केल्यास व त्या सोबत या ठिकाणी पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या मुलांसाठी अत्याधुनिक असे फुटबॉल, वाचनालय, लाबउडी, गोळाफेक, पुलप्स मारण्यासाठी खांब व इतर व्यायामाचे साहित्य, ग्रीन जिम अशा प्रकारे व्यवस्था केल्यास क्लब हाऊसला आपले गतवैभव पुन्हा मिळण्यास मदत होणार आहे.

क्लब हाऊसच्या देखभाली कडे महापालिका आणि स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. सातपूर परिसरात एकमेव असे मोठे क्रीडांगण व जॉगिंग ट्रॅक असल्याने सकाळच्या वेळेला व्यायाम करण्यासाठी येत असतो.परंतु क्लब हाऊसची दयनीय अवस्था झाली आहे.देखभाल केली जात नसल्याने मद्यपी चा वावर तसेच झाडे सुकूले आहेत.
– नितीन निगळ, नाशिक पश्चिम अध्यक्ष, रा.यु.कॉ

बातम्या

Don`t copy text!