नाशिक मिरर :
सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीत नायट्रोजन गॅस चा अचानक स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत सहा कामगार भाजल्याची घटना घडली आहे. अद्याप जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नाईस (NICE) परिसरात ललित हायड्रोलिक्स नावाची कंपनी आहे. या कंपनीत अचानक सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की कंपनीतून आगीचे लोळ बाहेर येत होते. दरम्यान, महापालिकेच्या आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
यादरम्यान, जखमी कामगारांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच जखमी कामगारांबाबत अद्याप माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
अधिक माहिती सह सविस्तर बातमी थोड्याच वेळात
