नाशिक मिरर :

सातपूर औद्योगिक वसाहतीतील हॉटेल शामसुंदर जवळ हायड्राेलिक सिलेंडर तयार करणाऱ्या ललित हायड्राेलिक सिस्टीम या कारखान्यात शनिवारी (दि.१८) सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी शक्तीशाली स्फाेट झाला. या स्फाेटात सहा कामगार जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

काम सुरु असतानाच अचानक सिलेंडरचा वाॅल फाटून भीषण स्फाेट झाला. या स्फाेटात सहा कामगार गंभीर भाजले अाहेत. स्फाेट असल्याने कारखान्याच्या छताचे सर्व पत्रे हवेत उडाले. तर खिडकीच्या काचा रस्त्यावर येऊन पडल्या हाेत्या. स्फाेटाचा अावाज एेकुन परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी जखमी कामगार मदतीसाठी याचना करत हाेते. स्थानिक नागरीक संदीप काळे, रमेश धात्रक, अमाेल बच्छाव यांनी जखमींना मदत करत खासगी वाहनाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. स्फाेटाची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलेे.

नायट्राेजन सिलेंडरची टेस्टींग करताना स्फाेट झाल्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
अाैद्याेगिक वसाहतीतील कामगारनगरलगत असलेल्या प्लाॅट नंबर डी- ७१ वर असलेल्या कारखान्यात अाॅइल प्रेशरचे सिलेंडर तयार केले जातात. शनिवारी सायंकाळी कारखान्यात नायट्राेजन सिलेंडरच्या टेस्टींगचे काम सुरु हाेते. यावेळी कारखान्यात ११ कामगार त्या ठिकाणी काम करत हाेते. सातपूर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशाेर माेरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवल्याने अग्निशामक दलाने तात्काळ परिस्थिती अाटाेक्यात अाणली.या घटनेत कंपनीचा पहारेकरी देवीदास पवार, चंद्रकांत निमसे, सूरज पेखले, लखन पांडे,राम कुमार व कृष्ण मुरारी हे जखमी झाले अाहेत.

बातम्या

Don`t copy text!