नाशिक मिरर वेबटीम : अखिल भारतीय वारकरी मंडळ,नाशिक जिल्हा यांच्या वतीने नाशिक जिल्हा कार्यकारिणी व नाशिक जिल्ह्यांतर्गत सर्व तालुका व शहर कमिटीचे उद्घाटन व नियुक्ती पत्र प्रदान सोहळा दिनांक १४ जानेवारी रोजी गणेश श्रीकृष्ण मंदीर शिवाजीनगर,सातपूर या ठिकाणी साधू महंतांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी ह.भ.प प्रकाश महाराज बोधले अ.भा. वा. मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष, ह.भ.प रूपीजी महाराज,गुजरात,श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद,ह. भ. प त्र्यंबक भगत,प्रदेशाध्यक्ष ह.भ. प अनिल महाराज वाळके,महामंडलेश्वर ह. भ.प रामकृष्ण महाराज लहवीतकर, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद गिरी महाराज,ह.भ.प अतुल महाराज आदमाने,ह.भ.प कांचन जगताप राज्य कमिटी सदस्य,आमदार सीमा हिरे,आमदार हिरामण खोसकर, भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले ,तसेच विविध मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी नाशिक जिल्हा कार्यकारणी व जिल्हांतर्गत सर्व तालुका व शहर कमिट्यांचे उदघाटन करून सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धर्माचार्य ह.भ.प निवृत्ती महाराज रायते,उपाध्यक्ष धर्माचार्य ह.भ.प निवृत्ती महाराज चव्हाण,सहजिल्हाध्यक्ष रामायनाचार्य भास्कर महाराज रसाळ, सहजिल्हाध्यक्ष महंत संजय दासजी महाराज शिंदे,सहजिल्हाध्यक्ष तुकाराम महाराज पवार, महाराष्ट्र प्रदेश संघटक तुकाराम महाराज घुगे,जनार्दन महाराज काकडे तसेच जिल्ह्यातील सर्व कमिटयांचे पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक ह.भ. प दिनकर पाटील नाशिक यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल महाराज आदमाने यांनी केले.

बातम्या

Don`t copy text!