नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधील महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे सरचिटणीस रवींद्र देवरे यांना भारत विकास प्रबोधनी ,कल्याण व विकासाची वाट विचार मंच च्या वतीने कसमादे भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दि.१४ फेब्रुवारी रोजी एसकेडी स्कुल ,देवळा येथे करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे सिनेअभिनेत्री प्रिया सुरते, मीना देवरे एसकेडी स्कुल संचालिका, ज्योत्स्ना आहेर नगराध्यक्षा देवळा, नितीन कुमार संचालक भारत विकास पबोधिनी, संजय मातोंडकर सा.पोलीस निरीक्षक देवळा यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक,शैक्षणिक, डॉक्टर अशा क्षेत्रातील एकूण ३० पुरस्कारार्थी ना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात अनेक उद्योग धंदे बंद होते.अशा काळात देखिल महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना सरचिटणीस तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ व माथाडी कामगार विकास सेना याच्या माध्यमातून रवींद्र देवरे यांनी अनेक बेरोजगार कामगारांना उद्योगधंदे बंद असताना शासनाकडून भांडण करून मीटिंग घेऊन कामगार आयुक्त पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बैठक घेऊन कामगार ,असंघटित कामगार ,माथाडी कामगार ,घरेलू महिला कामगार ,घर काम करणाऱ्या महिला कामगार, तसेच बांधकाम व्यवसायिक ,बांधकाम कामगार ,यांना शासनाच्या विविध योजनामिळवून दिली. तसेच लोक डॉन काळामध्ये कोणत्या प्रकारच्या बँक लोन हप्ते घेऊ नये यासाठी पुढाकार घेतला. तसेच सातपूर पोलीस स्टेशन यांना मदत म्हणून विशेष पोलीस अधिकारीचे टी शर्ट वाटप केले. अनेक कार्यकर्ते मदतीने कोरोना काळात पोलीस प्रशासन ची मदत केली. गरीब लोकं पर्यंत अन्नधान्य पोहचावे म्हणून पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत सेंट्रल वेअर हाऊस येथे महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास योजनेचे माथाडी कामगार काम करत होते. अन्नधान्य पुरवणे हे त्यांचं ध्येय होते .म्हणून माथाडी कामगारांना रेल्वेसेवा नसतानासुद्धा अत्यंत आवश्यक सेवा म्हणून धान्य पुरवठा करण्यासाठी कामगारांना नोटिसा देऊन कामावर ती हजर राहण्यास सांगितले. आणि जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला धान्य पुरवण्याचे काम महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक माथाडी कामगार विकास सेना संपर्कप्रमुख रवी देवरे यांनी जीवाची परवा न करता कार्य केले. म्हणून हा पुरस्कार कोरणा योद्धा तसेच कसमादे गुणगौरव पुरस्कार म्हणून यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच हरवलं हरवलेल्या व्यक्तींना व्यक्तींना वाट दाखवणे यांचा स्वभाव असून आत्तापर्यंत आणि वृद्ध महिलांना त्यांनी घरापर्यंत पोचवण्याची जबाबदारी स्वीकारले आहे. कामगारांना रोजगार देऊन त्यांनी नाशिकमधील अनेक लोकांना परिवारांना रोजगार दिलेला आहे. कामगार आयुक्त जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी मनपा अशा अनेक ठिकाणी आंदोलन करून कामगारांना न्याय मिळवून दिलेला आहे. म्हणून हा पुरस्कारासाठी रवींद्र यांची निवड करण्यात आली आहे.
