नाशिक मिरर वेबटीम : त्र्यंबक रोडवरील ई एस आय हाँस्पिटलच्या भिंतीलागून असलेल्या बेकायदेशीर ताडी विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सातपूर परिसरात ई.एस
.आय हाँस्पिटलच्या भिंतीलगत बेकायदेशीर ताडी विक्री दुकान सुरु असून या ठिकाणी मद्यपीची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.या ठिकाणी काही अंतरावर देवी मंदिर आहे.देवीच्या दर्शन साठी भाविक विशेषत महिला भाविक ही दर्शन साठी येत असतात.या मंदिरात व हाँस्पिटलला येणाऱ्या महिलांना मद्यपीचा सहन करावा लागत आहे.ताडी पिण्यासाठी येणारे रस्त्यावर कुठेही गाडी पार्क करतात. यामुळे रहदारीला सुद्धा अडथळा होत असतो.ताडी केन्द्र ला परवाना आवश्यक असतो. पंरतु हे विना परवाना दुकान सुरू असून राज्य उत्पादन शुल्क तसेच महानगरपालिकेची परवानगी नसून या जागेवर नवसागर व विषारी गुंगी चे औषध टाकून भेसळ युक्त ताडी बनवली जाते. ही ताडी मानवी जिवनास खुपच हानीकारक आहे.मानवी जिवनास हानिकारक ताडी विक्री दुकान बंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
