नाशिक मिरर : सोमवार दि.१९ जुलै २०२१ रोजी छावा क्रांतिवीर सेनेची राज्यस्तरीय बैठक शिर्डी शहरातील राहता तालुक्यात संपन्न झाली.
सदर बैठकीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या सर्व आघाड्यांची प्रदेश कार्यकारीणी,विभागीय कार्यकारिणी,जिल्हा कार्यकारीणी, तालुका व शहर कार्यकारीणीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीचे प्रास्ताविक विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे सर यांनी केले.बैठकीच्या सुरुवातीला कोरोना महामारीच्या काळात समाजातील,पदाधिकाऱ्यांच्या घरातील व्यक्ती,नातेवाईक आदींचे निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरोना महामारीच्या धर्तीवर अनेक महिन्यांपासून संघटनेच्या पदाधिकार्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये समाजसेवा अविरत सुरू होती. रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे ,रुग्णालयातील वाढीव बिल कमी करणे,औषध सामुग्री उपलब्ध करणे,गरजूंना लागेल ती मदत करणे आदि कामांमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत होते.
सर्व पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या सेवा व कामांचा आढावा या ठिकाणी मांडण्यात आला व ज्यांनी उल्लेखनीय कामकाज केले त्या सर्वांचे या ठिकाणी कौतुक करून अभिनंदन करण्यात आले. पुढील काळात देखील अशाच पद्धतीने समाजसेवेचे व्रत अविरतपणे चालू ठेवून
तळागाळातील सर्व सामान्य लागेल ती मदत करण्याचे आवाहन सर्व प्रदेश कार्यकारिणी व छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांनी केले.
तसेच सर्वांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.।मराठा आरक्षण,शेतकरी,विद्यार्थी, कामगार,महिला यांसंबंधित अन्याय अत्याचार आदींच्या समस्यांबाबत सर्वांनी जागृत राहून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करावं अशी सूचना या ठिकाणी देण्यात आली.
बैठकीमध्ये संघटनेचे पुढील अधिवेशन घेण्याच्या बाबतीत देखील विचार विनिमय करण्यात आला.या प्रसंगी अनेक जिल्ह्यातील उपस्थित जिल्हा प्रमुखांनी आपआपल्या जिल्ह्यात छावा क्रांतिवीर सेनेचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात यावे अशी मागणी व्यक्त केल्यामुळे अधिवेशन कुठल्या जिल्ह्यामध्ये घ्यायचं याबाबत या बैठकीमध्ये निर्णय झाला नसून पुढील बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एकमताने कुठल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अधिवेशन घ्यायचे याबाबतचा ठराव पास करण्यात येईल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आयोजक या नात्याने प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी आभार व स्वागत केले.
सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात राज्यस्तरीय आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली.यावेळी पुढील काळात संघटनेचा असलेला अजेंडा व कामकाजाची नियमावली याबाबतीत काटेकोर पालन करण्याचे आश्वासन उपस्थित सर्वांनी दिले. या बैठकी प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे, प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष माळोदे व बाबा रोटे, शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज, जराड, प्रदेश चिटणीस धनराज लटके, चित्रपट आघाडी प्रदेशाध्यक्ष मामा मोरे, प्रदेश प्रवक्ते जीवन राजे इंगळे, मुंबई कोकण अध्यक्ष चंद्रशेखर विशे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष वंदना कोल्हे, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, युवा प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात, उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोखे, चित्रपट आघाडी प्रदेशाध्यक्ष श्री मेस्वाल, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शांताराम गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष गणेश दादा माने, मराठवाडा सचिव भगवान सोरमोरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटक अमर शिंदे, आयटी प्रदेश कार्याध्यक्ष वैभव दळवी, वारकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष गोरख महाराज आहेर, नाशिक जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, आशिष हिरे, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष महेश गवळी, नांदेड जिल्हा अध्यक्ष दिलीप गवळी, बालाजी ढगे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष गंगाधर आवताडे, बीड जिल्हाध्यक्ष राहुल चाळक, अविनाश तांदळे, सांगली दिपक मुळीक, प्रसाद रेळेकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष भाऊ जगताप, सातारा विनायक साळुंखे, वैशाली झांजुरणे सुनंदा शिंदे, पुणे राजू फाले, विजू जरे रवी सातपुते, जालना किरण जोशी किरण चौधरी महादेव कदम, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संजय चौधरी, ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र पष्टे, नवी मुंबई अध्यक्ष गणेश कोरडे, परभणी जिल्हा अध्यक्ष योगेश गांगुर्डे, रायगढ जिल्हाध्यक्ष रोशन पवार, जळगाव जिल्हाध्यक्ष सुपडू दादा पाटील, वाशीम जिल्हाध्यक्ष गणेश गाजरे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष रितेश देशमुख, अमरावती जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेळके,नाशिक युवा जिल्हाध्यक्ष नितीन पाटील,सागर पवार,उत्तम कापसे,गोकुळ धोंगडे,नारायण जाधव,निलेश शेजुळ,अविनाश गोसावी,विकास काळे, सोनू गाडे,संदीप पवार यांसह सर्व आघाड्यांचे प्रदेश,विभागीय,जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

