सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळाल तर याद राखा ! सभापती योगेश शेवरे व मनसे गटनेते सलीम शेख यांचे कामात कूचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना खडेबोल

नाशिक मिरर :
सातपूर विभागामध्ये डेंग्यू ,चिकन गुणिया, मलेरिया आदीचे एकूण ८८ रुग्ण असून देखील सातपूर विभागातील मनपा प्रशासन व कर्मचारी यांचे ढिसाळ नियोजन दिसून येत आहे. दि. २२ जुलै रोजी योगेश शेवरे यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर सातपूर विभागात डेंग्यू व चिकणगुणिया चे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती वातावरण आहे.त्यामुळे विभागातील मनपा चे विभागीय अधिकारी नितीन नेर व सर्व विभागाच्या अधिकारी सोबत तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सभापती योगेश शेवरे व नगरसेवक सलीम शेख यांनी आयोजित बैठकीत डेंग्यू व चिकनगुणिया रोखण्यासाठी काय उपाय योजना करत आहात याबाबत सवाल व माहिती विचारली.परंतु संबधीत अधिकाऱ्याना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. कोरोना मुळे सर्वसामान्य कामगारांचे हाताचे काम गेले आहे.त्याचे अर्थचक्र बिघडले असून यातच गेल्या महिन्याभरा पासून डेंग्यू, चिकणगुणिया, मलेरिया आजारांनी सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून उपचारासाठी लाख रुपये कुठून आणणार, नागरिकांना दावाखान्याचे बिल भरण मुश्कील झाले आहे. असा प्रश्न नगरसेवक सलीम शेख यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच मलेरिया विभागातील कर्मचारी केवळ नगरसेवकांच्या घरी आरोग्य तपासणी व सूचना करण्यास जातात सर्वसामान्य नागरिकांच्या घरी कधी पोहचणार , कर्मचारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हजर नसतात. दिलेलं काम इमानदारी करत नाही.याकडे अधिकारी यांचे लक्ष नसते. अधिकारी हे जनतेचे सेवक असून त्यांनी आपल्या खुर्ची न्याय देऊन सर्वसामान्य नागरिकांची दुवा मिळेल असे काम करणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसून विभागात केवळ दिखाव्या पुरते कामे केली जात आहे.यामुळे विभागात डेंग्यू व चिकणगुणिया चे रुग्ण लाक्षणिक वाढत असून, यावर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याची सूचना उपस्थित अधिकारी यांना सलीम शेख याना केली.

 

तसेच सभापती योगेश शेवरे यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करावी,डेंग्यू व मलेरिया रूग्ण खुप प्रमाण वाढले आहे. मनपा प्रशासन ८८ रुग्णाची आकडेवारी दाखवत आहे. परंतु खाजगी रुग्णालये भरले आहेत.ती तपासली असता खरा आकडा जास्त प्रमाणात आहे.प्रशासन नागरिकांची दिशाभुल करीत असून, एक महिनापासून साथ चालु आहे. पण पाचही प्रभागात कोठेही जनजागृती नाही औषध फवारणी करताना दिसत नाही. सामान्य जनता त्रस्त झाली असून, सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळाल तर याद राखा असा इशारा देखील यावेळी दिला.मनपा ची यंत्रणा कमी पडत असेल तर आम्हाला सांगा आम्ही स्वता नागरिकांना सोबत घेऊन आमची आरोग्य यंत्रणा उभी करून घरोघरी जाऊन काम करु असे यावेळी अधिकाऱ्याना सुनावले. तसेच यावेळी स्वच्छता व आरोग्य विभाग, मलेरिया ,वैद्यकीय विभाग यांनी प्रभाग क्रमांक ८,९,१०,११ व २६ मध्ये संयुक्त मोहीम राबवून प्रत्येक घरोघरी पोहचून जनजागृती करून आरोग्य तपासणी करण्याचे आदेश यावेळी सभापती योगेश शेवरे, मनसे गटनेते सलीम शेख यांनी विभागीय अधिकारी नितीन नेर याना दिले.शुक्रवार दि.२३ पासून संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी नितीन नेर यांनी सांगितले. बैठकीसाठी स्वच्छता व आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, मलेरिया , ड्रेनेज, भुयारी गटार या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

योगेश शेवरे यांनी सातपूर प्रभाग सभापती पदभार स्वीकारला

सातपूर :
सातपूर प्रभाग समितीचा प्रभाग सभापती म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक योगेश शेवरे यांनी माजी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांच्याकडून पदभार गुरुवारी स्वीकारला. शेवरे हे पहिल्यांदा निवडून येऊन एका च पंचवार्षिक मध्यें दोनदा सभापती होण्याचा बहुमान मिळवणारे सातपूर मधील पहिलेच नगरसेवक आहेत.ऐन पंचवार्षिक च्या शेवटच्या टर्म मध्ये त्यांना सभापती चा मान मिळाल्याने सर्वाधिक विकास कामे करावीत अशी आशा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. यावेळी मा.महापौर अशोक मुर्तडक, मा.जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहर अध्यक्ष अंकुश पवार , मनसे गटनेते तथा प्रभाग ११ चे नगरसेवक सलीम शेख, नगरसेवक संतोष गायकवाड तसेच बंटी लभडे, सचिन सिन्हा, मिलिंद कांबळे, विजय आहिरे, आंबदास अहिरे आदींसह मनसे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!