नाशिक मिरर :

कोविड-१९ च्या नियंत्रणासाठी सामाजिक जनजागृती करून कोरोना महामारीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेअंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या शॉर्टफिल्म स्पर्धेत चुंचाळे मनपा शाळेच्या शिक्षिका हेमलता शांताराम भामरे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

 

” नो मास्क – नो गुड्स” ही प्रबोधनात्मक जनजागृती शॉर्ट फिल्म त्यांनी सादर केली होती. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोना जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध उपक्रम राबविले होते. या उपक्रमाला लॉकडाऊनच्या काळात नाशिककर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. या मोहिमेअंतर्गत झालेल्या शॉर्टफिल्म स्पर्धेत मनपा शाळेच्या शिक्षिका हेमलता भामरे यांनी प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व विशद करणारी ” नो मास्क – नो गुड्स” ही शॉर्टफिल्म सादर केली होती. या फिल्मला नाशिक मनपा स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या या यशाबद्दल महापौर सतीश कुलकर्णी, महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव , महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी त्यांचे अभिनंदन केले. कोरोना परिस्थितीत सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून नगरसेवक गुरमीत बग्गा, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.प्रथम पुरस्कार प्राप्त शॉर्टफिल्मची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली होती.

 

बातम्या

Don`t copy text!