नाशिक मिरर वेबटीम : महापालिकेच्या नाशिक पश्चिम विभागातील घनकचरा व्यवस्थापन (आरोग्य) विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, प्लॅस्टिकचा वापर करणे यांबाबत परिसरात धडक कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून लाखो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पालिकेच्या पथकाने १ ते ३१ डिसेंबर २०२० या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यावर १२२ केसेस करत एक लाख ६ हजार ४२०रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढील काळातही सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे, कचरा करणे, प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त करुणा डहाळे संचालक कल्पना कुटे,मनपा अधिकारी यांनी सांगितले आले आहे. या वेळी विभागीय अधिकारी एम.टी. हरीचंद्र, स्वच्छता निरीक्षक पी.डी पाटील, दिलीप चव्हाण,राजु गायकवाड, अशोक साळवे,अनिकेत कुलकर्णी,सोमनाथ वाघ, वाहन चालक सुरेश शिगोडे, उपस्थित होते.ही कारवाई पुढे ही सुरूच राहणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पालिकेच्या पथकाने केले आहे.
