नाशिक मिरर | इंदिरानगर : तुषार जगताप 

 

पाथर्डी फाटा परिसरातील प्लॅटिना हॉस्पिटल जवळ दुचाकीने जोरदार धडक दिल्याने ४१ वर्षीय महिलेच्या डोक्यास जबर मार लागल्याने उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास लताबाई सुभाष ताळीकोटे या प्लॅटिना हॉस्पिटल येथून पाई जात असतांना अज्ञात दुचाकी स्वाराने दिलेल्या जोरदार धडक दिली. या अपघातात ताळीकोटे यांच्या डोक्यास व हातापायासह पोटास जबर मार लागला. त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताळीकोटे यांना मृत घोषित केले. याबाबत अज्ञात दुचाकी स्वारावर इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

बातम्या

Don`t copy text!