नाशिक मिरर : वृत्तसेवा

अवघ्या दिड वर्षांवर सिंहस्थ महोत्सव येवून ठेपला आहे. सिंहस्थ काळात नाशिक -त्र्यंबकेश्वर रोडवर रोज लाखो भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे सातपूर जवळील ईएसआय हॉस्पीटल सर्व सोयी -सुविधा आणि यंत्रसामुग्रीसह परिपूर्ण असणे अंत्यत गरजेचे आहे. हॉस्पीटल परिपूर्णतेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या साधन -सामुग्री विषयीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना आमदार सिमाताई हिरे यांनी ईएसआय हॉस्पीटल प्रशासनाला केल्या आहेत.

 

ईएसआय हॉस्पीटलच्या सुसज्जतेसाठी आज आमदार सीमाताई हिरे यांच्या पवननगर कार्यालयात हॉस्पीटल प्रशासनाची बैठक पार पडली. यावेळी प्रशासनाला मार्गदर्शन करतांना आ.हिरे यांनी वरील सूचना केल्या. प्रस्तावित आयसीयू विभागासाठी दर्जेदार डॉक्टरांची नेमणूक करावी, डायनॉस्टिक सेंटरची उभारणी करावी,दंत तपासणीसाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, इमारतींच्या छतातून होणारी गळती थांबविण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, हॉस्पीटल परिसरात सुसज्ज पार्किंग व्यवस्था तयार करावी,टायपधारक हॉस्पीटलला वेळेवर पेमेंट देण्यासाठी नियोजन करावे, टायप धारकांचे रेट अपग्रेटिंग करावे, चोरीच्या घटना टाळण्यासाठी वाढीव सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, रिक्त पदे तातडीने भरावेत आदी मुद्दयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

सिंहस्थ काळात रोज हजारो वाहनांमधून लाखो भाविक नाशिकहून त्र्यंबकेश्वरला पर्वणी उत्साहासाठी जात असतात.यामुळे ईएसआय हॉस्पीटल सुसज्ज असणे अत्यंत गरजेचे आहे. हॉस्पीटलमध्ये सर्व सोयी -सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असून हॉस्पीटल परिपूर्णतेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या साधन -सामुग्री विषयीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना आमदार सिमाताई हिरे यांनी ईएसआय हॉस्पीटल प्रशासनाला केल्या.यावेळी हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.एन.पावरा,निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ.एम.ए. दांडगे, माजी वैद्यकीय अधिक्षक डॉ.सरोज जवादे,वैद्यकीय प्रशासन अधिकारी राजेश्री पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.आपल्याकडून आलेला प्रस्तावाच्या मंजुरीसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आ.हिरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

 

बातम्या

Don`t copy text!