नाशिक मिरर वेबटीम : शिवजन्मोत्सव समिती सातपूरच्या आज रविवारी सकाळी हाॅटेल मसाला झोन येथे झालेल्या बैठकीत शिवजन्मोत्सव समिती २०२१ सातपूर अध्यक्षपदी जी.एस. सावळे तर कार्याध्यक्षपदी सौ.कांता नीलेश शेवरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्ष हे राजकीय पक्षाचा नको या मतावर सर्वानुमते एकमत होऊन, त्यानुसार अध्यक्षपदी जी.एस.सावळे यांच्या नावाची नगरसेवक योगेश शेवरे यांनी सूचना केली, तर हिरामण रोकडे यांनी सूचनेला अनुमोदन दिले. कार्याध्यक्षपदी सौ.कांता नीलेश शेवरे यांच्या नावाला विक्रम नागरे यांनी सूचना दिली तर दिपक लोंढे यांनी अनुमोदन दिले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व पक्षीय व सर्व समाज समावेशक सदस्यांच्या उपस्थित यांची ही निवड प्रक्रिया करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी निवड ही २६ जानेवारी रोजी ४ वाजता शिंपी समाज कार्यालय सातपूर कॉलनी येथे करण्यात येणार आहे, तरी सातपूर विभागातील ज्या शिवप्रेमींना समिती मध्ये काम करायचे आहे. त्यांनी सदर बैठकीला उपस्थतीत रहाण्याचे आव्हान समितीच्या वतीने करण्यात आले.यावेळी जेष्ठ नगरसेवक सलीम शेख, समितीचे माजी अध्यक्ष किशोर निकम, नितीन निगळ, निवृत्ती इंगोले, खजिनदार जीवन रायते, व करण गायकर, दिनकर कंडेकर, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील, गौरव जाधव, लोकेश गवळी, संजय राऊत, समाधान देवरे, अनिल गडाख,राजू पाटील,वैभव ढिकले, योगेश गांगुर्डे, नरेश सोनवणे, दीपक वाघचौरे, कैलास गांगुर्डे,मुन्ना तुपे,किरण बढे आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!