नाशिक मिरर वेबटीम :
सातपूर मधील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय परिसरातील तब्बल ९ जुन्या ढेरेदार वृक्षांची शाळेच्या व्यवस्थापनांनी रविवार दि.२४ रोजी विनापरवानगी वृक्षतोंड केली.याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक महानगरपालिका मधील सातपूर विभागीय कार्यालयामधील उद्यान विभाग कडे विविध विकास संघटना संचालित, छत्रपती शिवाजी विद्यालय मधील संचालक नाना वाणी व रामनाथ शिंदे यांनी शाळेच्या इमारतीला अडथळा ठरणाऱ्या ६ वृक्षांची छोटणी करण्याबाबत मागणी केली होती. उद्यान निरीक्षक योगेश थोरात यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाहणी केली व जे वृक्ष डेरेदार होते ते वृक्ष छाटण्यास परवानगी दिली. परंतु आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्याची संधी साधत शाळा संचालकांनी खाजगी व्यक्तीचे माणसाना काम देऊन विना परवानगी व परवानगी नसलेल्या दुसऱ्याच झाडांची कत्तल केली. यामध्ये वड, पिंपळ, गुलमोहर, व गोरखचिंच इतर शो च्या इतर अशा ९ झाडांची कत्तल केली. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी करून वृक्ष छाटणी साठी वापरण्यात आलेले साहित्य ताब्यात घेतले. उद्यान निरिक्षक थोरात यांनी देखील वृक्षछाटणी ची पाहणी मनपाची कुठलीही परवानगी नसताना वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती दिली असून मनपाने कोणत्याही प्रकारचे वृक्ष तोडण्यास परवानगी दिली नसल्याने यावेळी स्पष्ट करून संबंधित संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. सदर वृक्ष तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
