नाशिक मिरर वेबटीम : महाराष्ट्र पोलिस अकादमी कर्मचारी वसाहतीतील तरूणीने राहत्या घरात पंख्याच्या कडीला ओढणी बांधून गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना दि.१८ रोजी सकाळी उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवी प्रमोद गायकवाड (30)रा. महाराष्ट्र पोलिस अकादमी यांनी घरात कोणीही नसतांना पंख्याच्या कडीला ओढणी व साडीची गाठ बांधून गळफास घेतला.गंगापुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. यापूर्वी देखील नाशिक मधील महाराष्ट्र पोलिस अकादमीत १६ डिसेंबर रोजी युवकानी आत्महत्या केली होती.महिनाभरातील ही आत्महत्या ची दुसरी घटना आहे.मार्च २०२० पासून कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अकादमी मधील पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थी, तेथील कर्मचारी व त्याच्या पाल्य यांना अकादमी बाहेर जाण्यास व बाहेरील कोणास आत मध्ये कोणास येण्यास मज्जाव आहे.त्यामुळे अनेक जण डिफ्रेशन मध्ये आहेत.
