नाशिक मिरर वृत्तसेवा : तुषार जगताप विशेष प्रतिनिधी 

ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेच्या वतीने बालकवी स्पर्धेच्या रौप्य महोत्सनिमित्ताने ज्ञानवर्धिनी संस्थेच्या वतीने सतत २५ तास काव्य वाचनाचा विश्वविक्रम करण्यात आला.यामध्ये दहा वर्षापासून खुल्या गटातील ६८० कवींनी सहभाग नोंदवला. दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी रुपेरी काव्यहोत्राचा वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सबुक मध्ये सदर उपक्रमाची नोंद होऊन विश्वविक्रम करण्यात आला. महाराष्ट्रातील ६८ शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या.१९ जानेवारी रोजी सायंकाळी सदर उपक्रमाचे समारोह सोहळा संपन्न झाला. 

कार्यक्रमाची सुरुवात साहित्य शिरोमणी कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, दिवंगत कवी आनंद जोर्वेकर यांच्याप्रतिमांचे पूजन तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मंचावर सुप्रसिद्ध वक्ते संस्थाचालक गुरुजी रुग्णालय चे संस्थापक तथा सीए प्रकाश पाठक, सुप्रसिद्ध अभिनेत्री ( उंच माझा झोका फेम अनुवादक )ऋग्वेदी प्रधान,वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक अमी जैना मुकेश छेडा, वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक अथर्व शुक्ल, कौशल घोडके, शिक्षण अधिकारी बी टी पाटील , कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास लोणारी नितीन ठाकरे, ईश्वर चव्हाण,कवयित्री अलका कुलकर्णी, नंदकिशोर ठोंबरे, कवी डॉ. चिदानंद फाळके , माननीय विनायक रानडे ,या समवेत ज्ञानवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष ल .जि. उगांवकर , सचिव माननीय गोपाळ पाटील सर सहसचिव डॉ. अंजली पाटील, संचालक छाया निखाडे, अनिल भंडारी,अजय ब्रम्हेचा, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक वासंती पाठक,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक माधुरी मरवट, आनंदवन बालमंदिराच्या मुख्याध्यापक पुनम सोनवणे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापक विद्या अहिरे व मुख्याध्यापक तनुजा कुलकर्णी उपस्थित होते. मंचावरील मान्यवरांचा संस्थेचे सचिव गोपाळ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागाच्या वेदिका कुलकर्णी या विद्यार्थिनीने गणेश वंदना सादर केली.

इंग्रजी माध्यमाचा प्री प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांनी डान्स* शाबासिया नृत्य सादर केले. तसेच प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी “माय मराठी, हसरा नाचरा ” अशा कुसुमाग्रजांच्या गीतावर नृत्य करून कुसुमाग्रजांना मानवंदना दिली.कुसुमाग्रजांना मानवंदना यावेळी देण्यात आली. इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी” मायभूमीही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची ” या गाण्यावर नृत्य सादर केले . विश्वविक्रमी कवींचा सहभाग असलेले काव्यहोत्र आणि स्मरणिका यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.कवयित्री मनीषा पाटील यांचे “विज्ञान जाणिवा “आणि माजी विद्यार्थी कवी स्वानंद पारखी यांचे “आनंदाचे सिंचन करूया” या काव्यसंग्रहा चे मान्यवरांच्या*हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

आपल्या मनोगतात बोलताना अतिथी मा. ऋग्वेदी प्रधान यांनी ज्ञानवर्धिनीच्या या अभूतपूर्वउ पक्रमाचे कौतुक केले. प्रकाश पाठक यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषाविषयक सांस्कृतिक जाणीवा संपन्न होण्याच्या दृष्टीने ज्ञानवर्धिनीचे महत्त्वाचे व अद्वितीय योगदान आहे. आज काव्यवाचनाचा विश्वविक्रम झाल्याने संपूर्ण मराठी भाषिक जनांसाठी ही सुखदवार्ता आहे .

 

परीक्षक कवयित्री अलका कुलकर्णी अनेक अनेक प्रकारचे विश्वविक्रम होतात. परंतु अभ्यासपूर्ण दृष्टीने कवितेचे मर्म रुजवण्यासाठी ज्ञानवर्धिनी ने केलेला हा प्रयोग अतुलनीय आहे. त्यामुळेच या विक्रमाने काव्य रसिकांची मान उंचावली जाईल प्रतिभावंत कवी कडे समाजात मानाचे पान म्हणून पाहिले जाईल.

संस्थेचे सचिव गोपाळ पाटील शालेय वयापासून विद्यार्थ्यांमधील सुप्त जाणीवा पूर्ण होण्यासाठी अनेकविध प्रयोग झाले आहेत. विद्यार्थीदशेपासून शालेय मुलांना आपली काव्य प्रतिभा प्रकट करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ संस्थेने निर्माण करून दिले आहे.आणि बघता बघताया उपक्रमाने पंचविशी गाठली याचा खूप अभिमान वाटतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा केदार व कल्पना चव्हाण यांनी आपल्या केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानवर्धिनी परिवारातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आयोजन नियोजन समिती तसेच सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी अमी छेडा वंडर बुक ऑफ रेकॉर्ड चे मुख्य निरीक्षक पश्चिम भारत अथर्व शुक्ल आणि कौशल घोडके समन्वयक यांचीं प्रमुख उपस्थिती होती. नाशिक मध्ये अनेक मान्यवर विनायक रानडे, फाळके अलका कुलकर्णी नंदकिशोर ठोमरे ,जयंत ठोमरे, संजय कंक, याचप्रमाणे संस्था अध्यक्ष ॲड ल. जी उगावकर, यांनी विशेष कौतुक केले.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!