नाशिक मिरर : नाशिक मनपा मध्ये सातत्याने पाठपुरावा करून सातपूर विभागातील नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका वर्षा भालेराव यांनी मनपाचे गंगापूर येथील आरोग्य केंद्र व महाराष्ट्र हौसिंग कॉलनी दवाखाना,सातपूर कॉलनी या ठिकाणी करोनाचे निदान होण्याकरिता (RTPCR) स्वॅबटेस्ट सुरू करण्यात आली आहे. सदर चाचणी संपूर्णतः मोफत असणार आहे.
गंगापूर रोड परिसर, आनंदवली, गंगापूर गाव, ध्रुव नगर, शिवाजी नगर, श्रमिक नगर, धर्माजी कॉलनी, सोमेश्वर नगर,सातपूर गाव, एमआयडीसी परिसर,अशोकनगर,चुंचाळे, पिंपळगाव बहुला या भागात राहणाऱ्या नागरिकांची सतत मागणी होत होती.(RTPCR) स्वॅबटेस्टिंगची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे. रिपोर्ट 48 तासानंतर मिळेल. सोबत आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.
रविवारी हे केंद्र बंद असेल. इतर परिसरातील नागरिक देखील येथे टेस्ट करण्याकरिता येऊ शकणार आहे.
