नाशिक मिरर वेबटीम : निफाडसह तालुकाभरात शनिवारपासुन कडाक्याची थंडी जाणवु लागली आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी गहु संशोधन केंद्रात रविवारी दि ७ रोजी पारा ७.२ अंशावर घसरल्याची नोंद झाली. तर द्राक्षपंढरी उगांव परिसरात पारा ८ अंशावर होता. या थंडीमुळे चालु‌ हंगामात द्राक्ष बागायतदारांना दुसरा‌ मोठा दणका बसला आहे
द्राक्षबागा परिपक्व अवस्थेत असतांना आलेल्या थंडीच्या लाटेत द्राक्षमण्यांची फुगवण थांबली होती. तर बहुतांश ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे जाऊन सरासरी दहा टक्के नुकसान झाले होते.आता द्राक्षबागांतील द्राक्षघड परिपक्व झाले आहेत.त्यातच सकाळी -सायंकाळी थंडी अन दिवसा कडक उन्हाचा परिणाम द्राक्षमण्यांना तडे जाणे तसेच उकाड्यासारखे संकट उभे राहिले आहे. एकुणच द्राक्षपंढरीत हंगामाची सुरुवात अन थंडीची लाट एकाच वेळी निर्माण झाल्याने द्राक्षपंढरी मधील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

बातम्या

Don`t copy text!