नाशिक मिरर वेबटीम : सातपूर परिसरात माणुसकीला लाज वाटावी अशी एक घटना समोर आली आहे.सर्वाना हवीशी वाटणारी गोंडस नकोशी शिवाजीनगर जलनगरी परिसरात असलेल्या फाशीचा डोंगराजवळ रस्त्याच्या कडेला दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता नुकतेच जन्मझालेली (साडेतीन तासाची )मुलगी सापडली आहे. त्यामुळे सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही मुलगी नकोशी झाली म्हणून फेकण्यात आली की, अनैतिक संबधामुळे फेकण्यात आली हा प्रश्न अनुउत्तरीत असून सद्या स्थितीत मुलीची प्रकृती उत्तम आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फाशीचा डोंगर परिसरात रविंद्र रामचंद्र पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव कुत्र्या सोबत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. फिरत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला.त्यांनी जवळ जावून बघितले असता एका प्लॉस्टिक च्या गोणी मध्ये बाळाला कपड्यात गुंडाळून ठेवले होते. रविंद्र यांनी तत्काळ आपल्या मित्रांना फोन करून बाळास श्रमिकनगर मधील खाजगी श्रीराम साई हॉस्पीटल मध्ये उपचारास दाखल केले. डॉ. मधुसूदन मोरे व डॉ राकेश पवार यांनी बाळास तपासून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बाळाचे वजन २ किलो ७०० ग्रम असून बाळाला व्हिटामीन्स के डोस देखील देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सदर ठिकाणी सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे,भाजपा युवा मोर्चा चे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील, मानवअधिकार संघाचे दिलीप पाटील यांनी घटनेची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी सदर मुलीचे शंकुतला असे नाव ठेवले असून सदर मुलीला दत्तक घेवून सांभाळ करण्याची इच्छा गंगासागरनगर परिसरात राहणाऱ्या भाग्यश्री विलास तकाटे व विलास तकाटे यांनी दर्शवली आहे.
मुलीला टाकून जाणऱ्या अज्ञात मातेविरोधात गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करणार असून अधिक तपास गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल करीत आहे.

