नाशिक मिरर वेबटीम : महाविकास आघाडी सरकारच्या निर्देशावरून महावितरण कंपनीने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्यासाठी पाठविलेल्या नोटीसच्या निषेधार्थ आज शुक्रवारी (दि.5) सातपूर भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयवार “टाळा ठोको व हल्लाबोल” आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज कनेक्शन तोडल्यास तसेच वाढीव बिलं रद्द करून वाजवी बिल आकारणी न केल्यास 15 दिवसानंतर जनआंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी भाजपा सातपूर प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, नगरसेवक दिनकर पाटील, भाजपा कामगार मोर्चा चिटणीस विक्रम नागरे, नगरसेविका हेमलता कांडेकर, मंडल अध्यक्ष अमोल इघे,भाजप उपाध्यक्ष रामहरी संभेराव,जगन पाटील, गोविंद बोरसे, सरचिटणीस चारुदत्त आहेर, भगवान काकड, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके, महिला मोर्चा अध्यक्षा संगीता शेळके, योगेश मालुंजकर, तुषार पगार, संदीप काळे, अनिल भालेराव, गणेश बोलकर, दिनकर कांडेकर, राजेश दराडे, अमोल पाटील, नितीन शेवरे, रवी भोर, गौरव शहाणे, स्वप्नील धिवरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्या नागरिकांना चुकीची बिलं मिळाली असतील त्यांना बिलं दुरुस्त करून देण्यात येईल. ज्यांना बरोबर बिलं मिळाली आहे त्या नागरिकांनी बिलं भरून सहकार्य करावे.
– प्रदीप वट्टमवार,
अति. कार्यकारी अभियंता,महावितरण सातपूर

