नाशिक मिरर :

सातपूर प्रभाग क्रमांक ११ चे मनसेचे जेष्ठ नगरसेवक सलीम  शेख यांचा वाढदिवस सातपूरच्या मनसे कार्यकर्त्यानी कोविड १९ शासनाचे नियमांचे पालन करुन साजरा केला.

 

सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच त्रस्त असल्याकारणाने याच माध्यमातून सातपूरला मनपाचे व राज्य कामगार विमा योजनेतील कार्यरत डॉक्टर्स, परिचारीकांनी जीवावर उदार होवून रात्रंदिवस रुग्णांची सेवा केली असल्याने त्यांचा या योगदानाबद्द्ल कोविड योध्दा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

दुपारच्या सत्रात मनपाच्या जिजामाता शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण सत्कारमुर्ती सलिम शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य विमा कामगार योजना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजश्री पाटील, डॉ.सरोज जवादे पाटील, डॉ.महेश दांडगे, डॉ. बी.एन.पावरा, तसेच सातपूर कॉलनीतील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल पगार, वैद्यकीय अधिकारी डॉ.शिप्रा पाटील, पी.एच.एन रोहिणी जोशी तसेच हॉस्पिटल मधील संपूर्ण स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते. मनसे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी डॉक्टर्स व कर्मचार्याचे आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक योगेश शेवरे, शहराध्यक्ष अंकुश पवार,विभाग अध्यक्ष योगेश बंटी लभडे,उपशहर अध्यक्ष सचिन सिन्हा, प्रवक्ते अंबादास अहिरे,सोपान शहाणे, प्रकाश दादा निगळ,ज्ञानेश्वर बगडे, वैभव महिरे,निशांत अण्णा शेट्टी, प्रवीण आहिरे,जयेंद्र खरात,विजय जगताप,शामराव गोहड,सिद्धेश सानप, विजय उल्हारे,जुनेद शेख, रवींद्र नागरे,मोहसीन मणियार, अफजल शेख,एजाज शेख,ज्ञानेश्वर निगळ आदीसह मनसे पदाधिकारी व हितचिंतक उपस्थित होते.

Don`t copy text!