नाशिक मिरर :  प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये अनेक महिन्यानंतर शाळेला उत्साही वातावरणात सुरुवात झाली. मुलं अतिशय आनंदाने शाळेत आली होती. त्यांचे व पालकांचे ड्रम वाजवत
गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पालक-शिक्षक संघ आणि व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. 

पुस्तकांचे वाटप

प्रारंभी सर्वांची तपासणी करून सॅनिटायझर लावण्यात आले व ऑक्सिजन तपासणीही केली. सामाजिक अंतर ठेवून त्यांना प्रवेश देण्यात आला. एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात आले होते. संस्था अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी सर्व शाळांना भेटी देईन सूचना दिल्या व पाहणी केली. उपाध्यक्ष दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम यांनी सूचना दिल्या. तसेच शाळा समितीचे अध्यक्ष पांडुरंग अकोलकर यांनी शुभेच्छा दिल्या. शासनाकडून प्राप्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

यांची उपस्थिती

मेरी शाळेत मुख्याध्यापक कुंदा जोशी, उपमुख्याध्यापिका सुनीता जोशी, पर्यवेक्षक केशव उगले, शशांक मदाने यांच्यासह जेष्ठ्य शिक्षक दिलीप अहिरे, पालक-शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष किरण काकड, छाया गुंजाळ, पंढरीनाथ बिरारी, साहेबराव राठोड,भामरे, क्रीडा शिक्षक आदी उपस्थित होते.
—-

बातम्या

Don`t copy text!