नाशिक मिरर : प्रतिनिधी

कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांनी शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसूत्रीच्या जोरावर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आणले, असे प्रतिपादन मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर यांनी केले.

मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांचा स्मृतिदिनी कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. याप्रसंगी ते बोलत होते.

                  दरेकर म्हणाले की, कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या कार्याची महती जितकी सांगावी तितकी कमीच आहे. वैद्यकीय क्षेत्र असो, सहकार क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो या प्रत्येक क्षेत्रात डाॅ. पवार यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मविप्र समाज संस्था म्हणजे डाॅ. पवार यांचा जीव की प्राण होता. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था व कर्मवीर डॉ. वसंतराव पवार हे जणू समीकरणच झाले होते.

कविता सादर

डॉ. पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षक सुनील काळे यांनी डाॅ. पवार यांच्या कार्याचा आढावा घेतला. क्रीडाशिक्षक हरीभाऊ डेर्ले यांनी डाॅ. पवार यांच्यावर स्वरचित कविता सादर केली.

यांची उपस्थिती

            व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील उपस्थित होत्या. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक शरद शेजवळ यांनी आभार मानले.

 

बातम्या

Don`t copy text!