राज्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांचा आणि १४४ पंचायत समितीच्या जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल घोषित झाला आहे.

राज्यात झालेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल लागलेत. नागपूर आणि नंदूरबारमध्ये जनतेने काँग्रेसच्या हाताला साथ दिली आहे. तर धुळ्यातली सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे. अकोल्यात पुन्हा एकदा वंचितचा करिश्मा पाहायला मिळाला. इकडे पालघरमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा धक्कादायकरित्या पराभव झाला. भाजप उमेदवार पंकज कोरे खासदार पुत्र रोहित गावित यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले. तर वाशिममध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी बाजी मारत प्रतिष्ठेची जि.प राखली.

जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या बाजी?

जिल्हा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर निकाल जाहीर एकूण जागा
अकोला १४ १४
धुळे १५ १५
नंदूरबार ११ ११
नागपूर १६ १६
पालघर १५ १५
वाशिम १४ १४
एकूण २३ १२ १७ १७ १६ ८५ ८५

बातम्या

Don`t copy text!