नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

दिंडोरी रोड येथील सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.26) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांचे अध्यक्षतेखालीखाली झूप ॲपद्वारे ऑनलाइन झाली. यावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
           कोरोनाच्या संकटामुळे नफा कमी झाला असला, तरी सभासदांना 6 टक्के लाभांश देण्याचा, तसेच सहकार खात्याच्या आदेशा नुसार 1 टक्का कर्जावरील व्याज कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी संस्थेची सर्व आर्थिक पत्रके सचिव अरुण म्हस्के यांनी वाचून दाखवली. तसेच सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. सभासदांनी आर्थिक पत्रकांना मान्यता दिली.
सभेतील चर्चेत सभासद विश्राम महाजन, मनोहर तांबे, राजेंद्र बांगर, विजय महाजन आदींनी भाग घेतला व संस्थेच्या चांगल्या कामकाजाचे कौतुक केले. व्हाईस चेअरमन राजाराम लोहकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

सुभाष काकड, अध्यक्ष – सप्तशृंगी नागरी सह. पतसंस्था, मेरी
संस्थेचे अध्यक्ष काकड यांनी, संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व सर्व सभासद व संचालक यांचे आभार मानले.
संचालक देवमन पाटील यांनी सभेला उपस्थित सर्व सभासद व संचालक मंडळ यांचे आभार मानले.
संचालक राहुल पवार, अविनाश दरगोडे हे प्रत्यक्ष तर संचालक एस. यू. पाटील, दिलीपभाई रुडाणी आदी ऑनलाइन हजर होते. सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. व्यवस्थापक अमोल सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
——-

बातम्या

Don`t copy text!