चांगले व काळे यांनी घेतली सुपारी; पोलिस तपासात निष्पन्न
नाशिक मिरर : आनंदवलीत १७ फेब्रुवारी सायंकाळच्या सुमारास रमेश मंडलीक या ७० वर्षीय वृद्धाची काही जणांनी हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.एकुण ९ संशयित कोठडीत असल्याचे सहा.आयुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.
मात्र या हत्येस धक्कादायक वळण लागले असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले असुन भुमाफीयांनी रमेश मंडलिक यांच्या हत्येची सुपारी भगवान चांगले व गणेश काळे नामक होमगार्ड़ला दिली असल्याचा संशय पोलिसानी व्यक्त करीत ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शहराचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडेय यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर काही भू माफियांकडून व नातलगांचे नाव पुढे आले आहे. त्यात प्रामुख्याने सचिन मंडलिक हा मुख्य संशयित आरोपी असुन जमिनीच्या वादातून रमेश मंडलिक यांची हत्या करण्यात आली असल्याची अतिशय धक्कादायक समोर आली आहे. पोलीसांनी बारकाईने केलेल्या तपासात सहा भू माफियानी मिळून जमीन विक्री करण्यास अडथळा ठरणारे रमेश मंडलिक यांच्या हत्येचा कट रचून त्यांची हत्या केली असून उर्वरित संशयित हे भूमाफियाच्या संपर्कात असल्याचे तपासा दरम्यान समोर आले आहे. पोलिसानी हत्येत वापर करण्यात आलेले हत्यार,मयताचे जाळलेले कपडे व ती जागा असे सर्वच पुरावे गोळा करण्यात आले आहे.आणि या हत्येसाठी मदत करणारे साथीदारा सह गुन्ह्यात सहभागीचा शोध सीसी टिव्ही कॉल रेकॉर्डची तपासणी सुरु आहे.आणि महत्वाचे ज्यांच्या साठी जमिनीच्या वादातून हत्या केली अशा जमीन प्लॉटवर मयताचे नाव असलेले ठिकाण पोलिस शोध घेत आहेत.या प्रकरणातील मुख्य संशयित रम्मी राजपूत आणि जगदीश मंडलिक हे सध्या फरार असून तीन पोलीस पथके त्यांच्या मागावर आहेत. तर इतर नऊ आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून एक मार्चपर्यंत त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान भू माफियांच्या अनेक टोळ्या सध्या शहरात कार्यरत असून या टोळ्या शहराच्या कायदा सुव्यवस्थेला घातक असल्याने आता दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी या हत्याकांड प्रकरणात लक्ष घालून या
भू माफीयांच्या मुसक्या आवळत रमेश मंडलिक यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कंबर कसली आहे.
सचिन मंडलिक ने सुपारी भगवान चांगले व गणेश काळे यांना ३० लाख रोख व १०गुठा प्लॉट देण्याचे कबूल केले होते.या गुप्त मिटिंगला अक्षय मंडलिक, नितीन खैरे,सागर ठाकरे,आबा भडागे,बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते.या मिटींगबद्दलची कमालीची गुप्तता बाळगण्यासाठी शपथ देखील घेण्यात आली होती.या सर्व नऊ संशयित आरोपींना १मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागुन सत्य समोर येईल अशी अपेक्षा आता पोलिसांनी व्यक्त केली.
