पर्यायी जागा द्यावी मगच स्थलांतर करावे ; महादेवनगर जनसेवक समितीची मागणी.
नाशिक मिरर :   सातपुर गावातील नंदिनी नदीच्या किनारी असलेल्या खोका मार्केट मागील भंगार मार्केट वस्तीतील २५ घरांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने  लाल फुल्या मारत अनधिकृत बांधकामे पडण्याचे आदेशीत केले आहे.यामूळे रहिवासी चिंतेत आहे.वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव पहाता आता जाणार कुठे असा यक्ष प्रश्न रहिवाश्यांंना पडला आहे.
      येथे गेल्या ३५ ते ४० वर्षापासून या जागेत वास्तव्यास आहे.मनपाकडून घरकुलाचे फॉर्म भरून मनपा घरकुल योजनेत घर देण्यात येणार होते.मात्र काल २५ घरांवर पूर्व सूचना व नोटीस न देता महापालिकेनं अतिक्रमणाचा बडगा उचलला आहे.महापालिकेने सदर कारवाई करण्यापूर्वी येथील रहिवाशांना विश्वासात घ्यायला हवे होते असे रहिवासी म्हणणे आहे.यामुळे तात्पुरती का होईना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन महादेव नगर जनसेवा समिती च्या वतीने लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
सदर भूखंडावर दशक्रिया विधीसाठी आलेल्या ग्रामस्थांना ऊन  वारा पाऊसापासुन संरक्षणासाठी शेड उभारण्यात येणार आहे.याबाबच्या सर्व मंजुरी प्राप्त झाली असल्याने तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे. – नितीन नेर
विभागीय आधिकारी सातपूर

बातम्या

Don`t copy text!