उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये आज १ हजार १८० ने घट

जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ९० हजार ५६३ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ३६ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक मिरर :
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ५६३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज रोजी च्या अहवाल नुसार सद्यस्थितीत ३६ हजार ९०६ रुग्णांवर जिल्हात उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १ हजार १८० ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ६४२, चांदवड ९८०, सिन्नर २ हजार २४७, दिंडोरी १ हजार ९३, निफाड २ हजार ३५६, देवळा ९५७, नांदगांव ५०४, येवला ७१०, त्र्यंबकेश्वर ३२७, सुरगाणा ४९०, पेठ १३७, कळवण ६२४, बागलाण १ हजार २९७, इगतपुरी ३७९, मालेगांव ग्रामीण ८३८ असे एकूण १५ हजार ५८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १९ हजार ३५६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७०७ तर जिल्ह्याबाहेरील २६२ असे एकूण ३६ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३१ हजार ३७ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८५.४२ टक्के, नाशिक शहरात ८९.३७ टक्के, मालेगाव मध्ये ८२.९८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.०९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.७७ इतके आहे.

एकूण मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार ६५६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ५६२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २५२ व जिल्हा बाहेरील ९८ अशा एकूण ३ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️३ लाख ३१ हजार ३७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ९० हजार ५६३ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३६ हजार ९०६ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण
८७.७७ टक्के.

दिनांक: 3 मे 2021 नाशिक कोरोना अपडेट

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 3 हजार 583

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2 हजार 720

नाशिक मनपा- 1184
नाशिक ग्रामीण- 1420
मालेगाव मनपा- 0083
जिल्हा बाह्य- 0033

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 3600

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -32

नाशिक मनपा- 07
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 25
जिल्हा बाह्य- 00

(वरील आकडेवारी नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

बातम्या

Don`t copy text!