नाशिक मिरर :
सातपूर पोलीस स्टेशन हद्दी मधील सातपूर परिसरातील नागरिकांवर राज्य शासनाने व नाशिक मनपाने निर्देशित केलेल्या कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्या मुळे ४२ दिवस धडाकेबाज कारवाई करून तब्बल ८ लाख ३५ हजार ६०० रुपये चा दंड सातपूर मधील नियमांचे उल्लंघन केलेल्या नागरिकांकडून सातपूर पोलिसांनी वसूल केला आहे. दिनांक १८ मार्च ते ३० एप्रिल रोजी दरम्यान सकाळी ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत या वेळात सातपूर मध्ये नाका बंदी करून एकूण १ हजार ३०२ इसमावर कारवाई केली.
धडक कारवाई ची मोहीम राबवून देखील सातपूर विभागातील नागरिक विनाकारण खोटे कारण देत रस्तावर फिरून कोरोना व्हायरस च्या प्रसारास एकप्रकारे मदत करीत आहेत.त्यामुळे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी नागरिकांना विनाकारण महत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर निघू नये असे आव्हान केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात थांबून आपल्या कुटुंबाची स्वतः ची काळजी घ्यावी.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर मधील सकाळ सर्कल, रिलायन्स पेट्रोल पंप, अशोकनगर या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सदर कालावधीत विनाकारण फिरणाऱ्या १ हजार ६०० नागरिकांची महानगरपालिकेच्या मदतीने अँटीजन टेस्ट केली यामधून ५० नागरिक कोरोनापॉझिटिव्ह सापडले.त्यांची कोविड केअर सेंटर ला रवानगी करण्यात आली. विना मास्क फिरणे, सामासिक अंतर न पाळणे, संचारबंदी चे उल्लंघन करणे, सार्वजनिक जागेत थुंकणे, रस्ता वर हातगाडी, टपऱ्या उघड्या ठेवणे, ऑटो रिक्षा, खाजगी वाहन चालक अशा वर कारवाई करण्यात आली.कंपनीत काम करणाऱ्या कामगार व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनी जाणे-येण्याच्या वेळात ओळखपत्र जवळ ठेवावे. जेणे करून त्यांना कोणी अडवणार नाही.
1) विना मास्क कारवाई १ हजार ५
केसेस मध्ये दंड – ४ लाख ७५ हजार /-
रुपये.
2) सार्वजनिक जागी थुंकणे
कारवाई – ३७ केसेस मध्ये
दंड – ३७ हजार /- रुपये.
3) सोशल डिस्टन्सीग न
पाळणारे आस्थापना वर
कारवाई – ५२ केसेस मध्ये
दंड – ७२ हजार /रुपये.
4) वेळ न पाळल्याने
आस्थापनेवर कारवाई २४
केस मध्ये दंड – ८३ हजार ५००/- रुपये.
5) संचार बंदी उल्लंघन दरम्यान केलेली
कारवाई – १३६ केसेस मध्ये दंड
– १ लाख ३६ हजार रुपये.
6 ) रोड साईड हातगाडी व
टपऱ्या कारवाई १६ केसेस
मध्ये १४ हजार ५००रुपये दंड.
7) सार्वजनिक वाहतूक ऑटो
रिक्षा कारवाई १५ केसेस
मध्ये ८ हजार रुपये दंड.
8) खाजगी वाहतूक करणारे
वाहनचालकांवर १७ केसेस
मध्ये ९ हजार रुपये दंड
10 ) सकाळ सर्कल, अशोक
नगर चौक आणि रिलायन्स
पेट्रोल पंप येथे नाकाबंदी
ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या १ हजार ६०० इसमांची तपासणी केली, त्यापैकी
५० जण पॉझिटिव्ह मिळून
आले.त्यांना कोविड केअर सेंटरपाठविले आहे.
१८ मार्च ते ३० एप्रिल एकूण कारवाई – १ हजार ३०२ केसेस मध्ये दंड = ८ लाख ३५ हजार ६०० /- रुपये जमा करण्यात आला.
कोरोना व्हायरस प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व कर्मचारी २४ तास कर्तव्य बजावत आहेत.यामध्ये विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना ,व्यापारी व दुकाने यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.परंतु तरी देखील नागरिक आपल्या कुटुंबाची काळजी न घेता रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे दिसून येतात. नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. – किशोर मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर
