महाराष्ट्रात ५३ हजार ३३५ कोविड रुग्ण पुर्णपणे बरे झाले

नाशिक मिरर : कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भीतीच्या दहशती मध्ये असणाऱ्या नाशिककरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. शनिवारी (दि.१७) दिवसभरात नाशिक जिल्ह्यातील तब्बल ५ हजार ३८७ कोरोनाबधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारीदेखील ४ हजार ५९६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या सलग दोन दिवस वाढत असल्याने नाशिक जिल्हावासीयांना दिलासा मिळाला असून, लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम समोर येत आहे. महाराष्ट्रात ५३ हजार ३३५ कोविड रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

       तरी नाशिककरांनी अधिक काळजी घेऊन घरी राहून आपल्या कुटुंबाची काळजी घेतल्यास नाशिक कोरोना मुक्त होण्यास मदत होणार आहे.यासाठी अनावश्यक गर्दी टाळणे आवश्यक असून,महत्वाच्या कामांशिवाय घरा बाहेर पडू नये.यामुळे वाढणारे रुग्ण संख्येत घट होणार आहे.नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा हा बरे होणाऱ्यांपेक्षा जास्तच दिसत आहे. मात्र दोन दिवसांपासून यात बदल झाला असून, कोरोनाबाधितांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची वाढती संख्या नाशिककरांसाठी सुखद धक्का देणारी आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या बातम्यांनी काळजाचे ठोके चुकत असताना शुक्रवारी आणि शनिवारी मात्र नाशिककरांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे.

शुक्रवारी दिवसभरात ४ हजार ५९६, तर शनिवारी ५ हजार ३८७ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा चांगला परिणाम समोर आल्याचे दिसत आहे. नागरिकांनी आणखी १५ दिवस नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण असेच वाढत जाऊन कोरोनाबधितांचा आकडा नक्कीच कमी होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनासह वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बातम्या

Don`t copy text!