सातपूर पोलिसांची रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची अंटीजन्ट टेस्ट करून केली कोविड सेंटर ला रवानगी
नाशिक मिरर :
सातपूर मध्ये अशोकनगर रस्तावर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ५० जणांवर सातपूर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांची अंटीजन्ट टेस्ट करण्यात आली. यात चार जण पॉझिटिव्ह सापडले असून, त्यांना ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.
सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत अशोक नगर चौकात पोलिस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस उपायुक्त (परिमंडळ 2) विजय खरात, सहा. पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड 19 चे उल्लंघन करणाऱ्या, विना मास्क,विनाकारण सार्वजनिक रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिक व युवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यासाठी मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्याकडून एकत्रित पणे कारवाई करण्यात आली.
त्यात ५० इसमांची अशोक नगर चौकात अंटीजन्ट टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४ नागरिक पॉझिटिव्ह मिळाल्याने त्यांना ठक्कर डोम येथे पाठविण्यात आले. अशीच कारवाई सातपूर परिसरात नियमितपणे चालू राहणार आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर फिरू नये, करोणाची ब्रेक द चैन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात येते आहे.

