नाशिक मिरर वेबटीम :  श्रमिकनगर येथील फुले-शाहु आंबेडकर बहुद्देशीय संस्थेच्यावतीने व बी.एम.ए.ग्रुपच्या सहकार्याने शौर्य दिन,सावित्रीबाई फुले जयंती आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून सातपूर व सिडको परिसरातील पत्रकार बांधवांचा व सामाजिक क्षेत्रातील रणरागिणी महिलांचा शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले महिला शौर्य पुरस्कार डॉ.शितल पवार,डॉ वैशाली खरे,भावना महाजन (सहाय्यक पोलीस निरीक्षक),नीता महाजन (शिक्षिका ),वैशाली जाधव (सामाजिक ) व धम्मनायिका महीला बहुउद्देशीय मंडळ नाशिकरोड यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे रविवार दिनांक ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता रामजी हॉल मौले हॉल जवळ सातपूर येथे सदर कार्यक्रम होणार आहे.तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास भवन चे प्रदीप पोळ,सुदर्शन नगरे,नितीन कावेडे,भारत शेगावकर,श्रीकांत गांगुर्डे,प्रदीप पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बी.एम.ए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहन अडांगळे,जगन्नाथ भरीत,संजय भरीत,मधुकर खंडवी,यशवंत भवरे,सतीश गांगुर्डे,भगवान भालेराव, यशवंत तेलोरे आदींनी कले आहे.

बातम्या

Don`t copy text!