नाशिक मिरर : 

दोन दिवसांपूर्वी सिडको मध्ये पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने तीन जणांना कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडत नाही तोच बुधवारी रात्री स्टेट बँके जवळ सोनाली मटन भाकरी हॉटेलच्या परिसरात एकास फरशी व खुर्ची ने जबर मारहाण करून खून केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका ला ताब्यात घेतला आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
पोलिसांनी माहिती दिली की, स्टेट बँक जवळील सोनाली हॉटेल जवळ दि.२८ रोजी बुधवारी रात्री पावने दहाच्या सुमारास तीन ते चार युवकांनी प्रसाद भालेराव ( वय २५ ) रा. उपनगर परिसर नाशिकरोड या युवकाला किरकोळ कारणा वरुन फरशिने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. या घटने नंतर वरिष्ट पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, गुन्हे शाखा सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे सह घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून . मारहाण करणाऱ्या पैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे . पुढील तपास अंबड पोलिस करीत आहे.

बातम्या

Don`t copy text!